Home नांदेड मुक्रमाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण रथाचे जंगी स्वागत

मुक्रमाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण रथाचे जंगी स्वागत

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20231011-WA0012.jpg

मुक्रमाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण रथाचे जंगी स्वागत
मुक्रमाबाद प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ ला ६० वर्ष पूर्ण होत असल्याने हे वर्ष विश्व हिंदू परिषदेचे षष्टिपूर्ती वर्ष आहे. यानिमित्तानेवर्षभर देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्यविभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या षष्ठीपूर्ती वर्ष निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचा युवा संगठन कार्यविभाग बजरंग दलाने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण व्हावे तसेच हिंदू साम्राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, हिंदूपदपातशाही रूपाने नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण सर्व हिंदू समाजाने करावे. राष्ट्र जागरण कार्यातील महाराजांच्या योगदानाबद्दल समाजातील महाराजांविषयीचा कृतज्ञतेचा भाव वृद्धिंगत व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पुढाकाराने सकल हिंदू समाजाच्या सहभागाने देवगिरी प्रांतामध्ये भव्य शौर्य जागरण यात्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी राष्ट्र व धर्म जागरणासाठी सर्व हिंदू समाजाने यात्रांमध्ये सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यात आपले बहुमोल योगदान द्यावे
दि.९ सोमवारी संध्याकाळी ६ वा.रथाचे आगमन जय शिवाजी जय भवानी,जय श्रीकृष्ण,जय श्रीराम या जय घोष देत भवानी चौकात दाखल झाले
तदनंतर भवानी मंदिराच्या सभामंडपात मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे योगि श्री पुरण महाराज,गीरीष वजलवार, शशिकांत पाटील, गीरीश गोले, गणेश यशवंतकर, संतोष पोदार,अॅड शिवराज आप्पा खंकरे, मा. भालचंद्र तिडके,कार सेवक विश्वनाथ अन्ना खळुरे,राम भक्त गजानन पोलावार,दिलीप आवडके, संतोष वट्टमवार, रामभाऊ खंकरे,शिवदास बोधने, नागनाथ पारसेवार,सुरेश दासरवार,मुरली पांचाळ,मंगेश घोगरे,आदिने परिश्रम घेतले.साह्यक निरीक्षक मा.भालचंद्र तिडके साहेब,हा.उपनिरीक्षक गजानन कागने साहेब, बिट जमादार आडेकर साहेब यांचेहि सहकार्य लाभले.आयोजक वंदे मातरम् खडकेश्र्वर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here