Home कोल्हापूर वडगांव महावितरण शाखा अभियंता कदम यांची तात्काळ बदली करा – तय्यब कुरेशीवडगांव...

वडगांव महावितरण शाखा अभियंता कदम यांची तात्काळ बदली करा – तय्यब कुरेशीवडगांव महावितरण शाखा अभियंता कदम यांची तात्काळ बदली करा – तय्यब कुरेशी

362
0

राजेंद्र पाटील राऊत

वडगांव महावितरण शाखा अभियंता कदम यांची तात्काळ बदली करा – तय्यब कुरेशी
कोल्हापूर ,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पेठ वडगांव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे शाखा अभियंता शिवाजी कदम यांच्या मनमानी कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा चे वतीने जिल्हा सरचिटणीस तय्यब कुरेशी यांनी आज कोल्हापूर येथील विद्युत भवन मद्धे कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य अभियंता मा.परेश भागवत यांना भेटून कदम यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करणेत आली.
यावेळी मुख्य अभियंता मा.परेश भागवत यांच्या समोर शाखा अभियंता शिवाजी कदम यांच्या मनमानी कारभाराची यादीच मांडणेत आली व 5 वर्षे झाली तरी कदम याची इतरत्र बदली का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला व शाखा अभियंता हे नोकरीच्या ठिकाणी रहिवाशी असणे बंधनकारक असताना कदम हे पन्नास किलोमीटरवर राहत असलेचे निदर्शनास आणून दिले ,
तसेच भाजपा किसान मोर्चाचे भगवानराव काटे यांनी वडगांव शहरवासीयांच्या सहनशीलतेचा गैरफायदा ना घेता कदम यांच्या गैरकारभाराची चौकशी करून तात्काळ बदली करणेची मागणी करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला,
यावेळी मुख्य अभियंता मा.परेश भागवत यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत कदम यांची चौकशी करून कार्यवाही करणेचे आश्वासन दिले.
यावेळी तय्यब कुरेशी,झाकिरभाई जमादार जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, भगवानराव काटे जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, रहीम मोमीन,भाजपा वडगांव शहर अध्यक्ष, जावेद सय्यद व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here