Home Breaking News लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2021 श्री महेश पोळ यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल...

लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2021 श्री महेश पोळ यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

384
0

लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2021
श्री महेश पोळ यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

राहुल शिंदे कोल्हापूर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी : श्री उदय सामंत. – शिक्षण मंत्री – उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य. तसेच श्री रंजितसिंह डिसले – ग्लोबल टीचर अवॉर्ड विनर
लोकमत मीडिया चे संपादक श्री वसंत भोसले.
यांचे उपस्थितीत सोहळा पार पडला.
श्री महेश पोळ यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण संस्था उभारून पेठ वडगाव व परिसरात सामान्य विद्यार्थ्यांकरिता एक शिक्षणाचे जिनिअस इंग्लिश मेडियम स्कूल पेठ वडगाव या नावाने इंग्रजी माध्यमाचे दालन उभा केले. आजपर्यंत शेकडो विद्यार्थी या संस्थेतून शिक्षण घेऊन यशस्वीरित्या पुढील शिक्षण व मोठ्या पदावर कार्यरत आहेत. फक्त सहा विद्यार्थ्यांनी सुरुवात होऊन आज 600 पेक्षा जास्त विद्यार्थी सदर संस्थेत शिक्षण घेतात.
यापूर्वी श्री. महेश पोळ यांना डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कारही 2019 साली मिळालेला आहे.
सदरचा पुरस्कार हा कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतून मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here