Home माझं गाव माझं गा-हाणं जि. प. प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे येथे १४ शाळांना एज्युकेशन लर्निंग किट...

जि. प. प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे येथे १४ शाळांना एज्युकेशन लर्निंग किट वाटप व गरजवंत कुटुंबांना किराणा वाटप कार्यक्रमाचे आयोजन

283
0

राजेंद्र पाटील राऊत

जि. प. प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे येथे १४ शाळांना एज्युकेशन लर्निंग किट वाटप व गरजवंत कुटुंबांना किराणा वाटप कार्यक्रमाचे आयोजन
सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ मंगळवार रोजी जि. प. प्राथमिक शाळा अजमीर सौंदाणे तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे संजीवनी स्वयंसेवी संस्था अंतर्गत अजमीर सौंदाणे व देवळाने यासह १४ शाळांना एज्युकेशनल किटचे मोफत वाटप करण्यात आले.
त्याच प्रमाणे एज्युकेशनल किटचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संजीवनी स्वयंसेवी संस्थेमार्फत गावातील गरजवंत कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आले.
याप्रसंगी श्री. नामदेव नागरे साहेब असिस्टंट डायरेक्टर, श्री. बाबासाहेब नागरगोजे प्रकल्प व्यवस्थापक, श्री. अहिरे साहेब एचडीएफसी मॅनेजर, श्री. रोडजी ठाकरे प्रोजेक्ट मॅनेजर, श्री. यशवंत कडाळे फिल्ड कॉर्डिनेटर, श्री. गावित सर फिल्ड कॉर्डिनेटर, श्री. धनंजय आबा पवार सरपंच अजमीर सौंदाणे, श्री. अंबादास आहिरे जिल्हाध्यक्ष पदवीधर चेअरमन, श्री. गायकवाड साहेब केंद्रप्रमुख राज्याध्यक्ष , श्री. जगदीश बधान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री. दादाजी पगारे मुख्याध्यापक आणि १४ शाळांमधील प्रत्येकी दोन शिक्षक उपस्थित होते.
संजीवनी स्वयंसेवी संस्थेमार्फत सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here