Home महाराष्ट्र तर ग्रा.पं. कर्मचारी करणार ९ एप्रील पासुन पुन्हा कोल्हापुरात बेमुदत आंदोलन ग्रामपंचायत...

तर ग्रा.पं. कर्मचारी करणार ९ एप्रील पासुन पुन्हा कोल्हापुरात बेमुदत आंदोलन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या बैठकीत निर्णय

189
0

राजेंद्र पाटील राऊत

तर ग्रा.पं. कर्मचारी करणार ९ एप्रील पासुन पुन्हा कोल्हापुरात बेमुदत आंदोलन
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या बैठकीत निर्णय
पत्रकार सतिश घेवरे मालेगाव
नाशिक राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागील अनेक वर्षापासुन विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटकशी संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने ग्रामविकास मंत्री मा . ना .हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील बिंदू चौकात १ जानेवारी पासुन राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती . तब्बल आठ दिवसानंतर सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन सलग तीन दिवस झालेल्या बैठकीत महासंघाच्या शिष्टमंडळाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते . त्यानंतरच कोल्हापुरातील सुरु असलेले ग्रा .पं. कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते . २७ जानेवारीला मंत्रालयात झालेल्या संयुक्त ऑनलाईन बैठकीत सुध्दा मागण्या मान्य करुन संबंधित वित्त विभागाशी बोलून लवकरच फिजिकल बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले होते . मात्र अद्यापही बैठक घेण्यात आली नाही .
ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करुन त्वरीत वेतनश्रेणी लागु करा, दि .१० ऑगस्ट२०२०च्या कामगार विभागाच्या अधिसुचनेची अंमलबजावणी करुन ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनासाठी आर्थिक तरतुद करा,शासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतन अनुदानासाठी असलेली कर वसुलीची आणि उत्पन्नाची जाचक अट रद्द करुन १०० टक्के अनुदान दयावे , कालबाह्य झालेला आकृतीबंध रद्द करावा, ग्रॅच्युटीची मर्यादा वाढविण्यात यावी तसेच निवृत्ती नंतर ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागु करा यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मागील अनेक वर्षापासुन महासंघाच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातुन शासन दरबारी पाठपुरावा करत आहे .परंतु शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केल्या जात आहे . १ जानेवारी पासुन कोल्हापुरातील आंदोलना दरम्यान मान्य केलेल्या मागण्यांची आणि मा मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनांची राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशना पर्यंत पुर्तता न केल्यास कोल्हापुरातील बिंदु चौकात पुन्हा दि .९ एप्रील२०२२पासुन राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आज नाशिक येथे झालेल्या म .रा. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला . महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा .कॉ. तानाजी ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला कार्याध्यक्ष कॉ . मिलिंद गणवीर ,सरचिटणीस कॉ . नामदेव चव्हाण, सखाराम दुर्गुडे , मंगेश म्हात्रे, बबन पाटील, अँड .सुधीर टोकेकर, अँड . राहुल जाधव, हरिशचंद्र सोनावणे, निळकंठ ढोके , वसंत वाघ, अमृत महाजन तसेच आयटकचे राज्य सचिव कॉ राजु देसले यांचे सह महासंघाचे निमंत्रीत प्रातिनिधी उपस्थित होते

Previous articleरांगोळीत विविध कलाकृती प्रिन्सीकाचा आगळा वेगळा छंद
Next articleरानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here