Home महाराष्ट्र सहकार हा विषय राज्यांच्या अंतर्गत येतो तर देशपातळीवर आधीपासूनच सहकार विभागाचे काम...

सहकार हा विषय राज्यांच्या अंतर्गत येतो तर देशपातळीवर आधीपासूनच सहकार विभागाचे काम कृषी खात्याअंतर्गत होतो – ना.नवाब मलिक

112
0

राजेंद्र पाटील राऊत

सहकार हा विषय राज्यांच्या अंतर्गत येतो तर देशपातळीवर आधीपासूनच सहकार विभागाचे काम कृषी खात्याअंतर्गत होतो – ना.नवाब मलिक

प्रतिनिधी / राजेश भांगे

केंद्रातील मोदी सरकारने नवीन सहकार विभाग तयार केला आहे.
या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र अमित शाह यांच्याकडे सहकार विभाग दिल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते जाणीव पूर्वक संभ्रम पसरवत असून आता राज्यातील नेत्यांची खैर नाही, असा अपप्रचार करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केली आहे.
आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र सरकार सहकार विभागाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा विस्तार करणार असेल तर त्याला आम्ही पाठिंबाच देऊ. मात्र या विभागाचा वापर करुन जर राज्यातील सहकाराची पाळंमुळं कमकुवत करायची असतील, तर त्याचा आम्ही विरोध करु.
अमित शाह हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांचे नाव घेऊन भाजपा नेत्यांनी धमक्या देऊ नयेत, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

सहकार हा राज्यांचा विषय आहे. सहकारी बँकासंदर्भात मागच्या काही काळात रिझर्व्ह बँकेने काही नियम लागू केले होते. त्याला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
केंद्र सरकारने आता नव्याने सहकार खाते निर्माण केल्याने या खात्यांतर्गत काय निर्णय घेतले जातात, हे खाते काय काम करणार हे सध्या कळू शकत नाही. घटनेत ९७ व्या घटना दुरुस्तीन्वये सहकारी संस्थांना स्वायत्तता देण्यात आली आहे.
एखाद्या सहकारी संस्थेवर किती सदस्य असावेत, निवडणूक कशी पार पडावी याबाबत नियमावली करण्यात आली आहे. या स्वायत्ततेवर कुणी गदा आणली तर तेव्हाच आम्ही त्याबाबत बोलू, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्लास्ट्रो, प्रवक्ते महेश चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here