Home नांदेड देगलूर नगर परिषदेचे व ड्रेनेजचे गुत्तेदारा यांच्या मिलीभगती मुळेच देगलूर शहराचा सत्यानास...

देगलूर नगर परिषदेचे व ड्रेनेजचे गुत्तेदारा यांच्या मिलीभगती मुळेच देगलूर शहराचा सत्यानास – अशोक कांबळे देगलूरकर

364

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर नगर परिषदेचे व ड्रेनेजचे गुत्तेदारा यांच्या मिलीभगती मुळेच देगलूर शहराचा सत्यानास – अशोक कांबळे देगलूरकर

नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे

मागच्या युती सरकार मध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ५६ कोटी रुपये मंजूर केला तत्कालीन नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्द्मवार यांच्या काळात या कामाला प्रथमता उद्घाटन होऊन सुरवात झाली, पण या वेळचे पूर्ण साडे चार ते पाच वर्ष संपत येत आहेत पण काम काही मार्गी लागत नाही याचे प्रश्न सर्व देगलूर वासियांना पडले आहे . शहरात जागोजागी खड्डे पडल्याने चार चाकी दुचाकी वाहन धारकास शहरांच्या मुख्य रस्त्याने गाड्या चालवतांना खूप अडचण होते आहे .
तर आज पर्यंत अबाल वृद्ध असे बरेचसे लोक या खड्ड्यांमध्ये पण पडले आहेत, याचा स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने याची गंभीर दखल घ्यावी,
वारंवार यामुळे शहरांमध्ये अक्सिडेंटचे पण प्रमाण वाढले आहे.
गल्लीबोळातील उत्तम दर्जाचे असलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते फोडून त्याची चाळनी झाली आहे.
आता सध्या परिस्थिती मध्ये पैदल चलता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती संपूर्ण शहरभर झाली आहे पूर्ण शहर चिखलमय परिस्थितीतून जगत आहे याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.
असे मत देगलूर भाजप पदाधिकारी अशोक लालू कांबळे देगलूरकर यांनी व्यक्त केले.