Home नांदेड मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथील १४ वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने...

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथील १४ वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू.

266

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथील १४ वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासुन पावसाची संततधार सुरु असुन उन्द्री (प.दे.)येथे ३१ ऑगस्ट रोजी पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने नदी – नाल्यांना पुर आला होता . या पुराच्या पाण्यात सकाळी ७ वाजताच्या सुमारास १५ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे . उंद्री ( प.दे. ) ता.मुखेड येथे ३१ ऑगस्ट रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाला . या पावसामुळे उंद्री गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला सकाळी ७ वाजता अचानक पुर आला.सदर नाल्याकडेला शौच्छास बसलेला १५ वर्षीय मुलगा कमलाकर दत्तात्रय गडाळे हा त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली . मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समजताच नातेवाईकांनी व गावातील नागरीकांनी त्याचा शोध घेतला असता , दुपारी त्याचा मृतदेह चोंडी शिवारात सापडला असुन महसुल व पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.सदर घटनेचा पंचनामा सुरु असुन या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे .