Home गडचिरोली नवरगाव ग्रामपंचायत तर्फे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबवून गाव केला स्वच्छ।

नवरगाव ग्रामपंचायत तर्फे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबवून गाव केला स्वच्छ।

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0000.jpg

नवरगाव ग्रामपंचायत तर्फे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबवून गाव केला स्वच्छ।

१५ दिवसातुन एकदा गाव स्वच्छ करु अशी गावकर्यांनी घेतली शपथ

(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली: राष्टपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केद्र शासनाच्या “स्वच्छता हि सेवा” पंधरवाडा अंतर्गत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत येणार्या राजोली ,येरंडी,बूरानटोला येथिल गावातील रस्ते,झेडपी शाळा,ग्रामपंचायत ऑफिस परिसर, अंगणवाडी परिसरात स्वच्छता करण्यात आले.

या अभियान अंतर्गत केवळ कचरा साफ करणे म्हणजे स्वच्छता नाही तर प्रत्येक व्यक्तिने पर्यावरण पुरक जीवनशैली राबवून आणि आपले जिवन पुरक बनवावे.व्यक्ती श्रीमंत असो गरिब, शिक्षक असो अशिक्षित,शहरी असो ग्रामीण प्रत्येकाने स्वच्छता पाडली,तर हिच खरी राष्ट्रसेवा असा संदेश नवरगाव ग्रामपंचायतीने दिला.

यावेळी नवरगाव चे सरपंच सौ.रंजना ताई सिडाम,उप सरपंच ,लक्ष्मी झिञु कोवा,सचिव खुशाल नेवार,ग्राम पंचायत मैबर कपील कोवा,कपील गेडाम,बिसन हलामी,रोशनी कोकोडे,रेशमीला मडावि,रूपाली कोरचा,सर्व आशा वर्क,अंगणवाडी सेविका,महिला बचत गटातील महिला,गावकरी,पुरुष, महिला,युवक, युवती,शाळेचे मुख्याध्यापक,,विद्यार्थी विद्यार्थिनी,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहून,श्रमदान एक तास करून,गाव स्वच्छ केला व नियमीत १५ दिवसातुन गाव स्वच्छ करण्याचे ठरविले असून शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here