• Home
  • 🛑 *नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर एक हजार बस* 🛑

🛑 *नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर एक हजार बस* 🛑

🛑 *नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर एक हजार बस* 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सध्या ७५० बसची व्यवस्था
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मार्गावरील बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2 नोव्हेंबर पासून शहरातील विविध मार्गांवर 1 हजार संचलनासाठी सज्ज राहणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद असणारी पीएमपी 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, पहिल्यांदा केवळ 30 टक्के बस मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. त्या वाढ करुन ऑक्टोबर महिन्यात 550 मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता 2 नोव्हेंबर पासून शहरातील विविध मार्गावर 1 हजार बस सोडण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणार्‍या पीएमपीची प्रवासी सेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याचा शेवटचा आठवड्यापासून बंद होती. अत्यावश्यक सेवेसाठी केवळ 125 बस मार्गावर सोडण्यात येत आहे. 3 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा प्रवासी सेवा सुरु करण्यात आली आहे. केवळ 30 टक्के बसच मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांची संख्या लक्षात घेता टप्प्या टप्यात मार्गावर बस वाढविण्यात येतील असे प्रशासनाने स्पष्ट केले होते.

दसर्‍यापासून 750 बस मार्गावर सोडण्यात येत आहे. प्रवाशांकडून मागणी वाढल्याने रस्त्यावरील बस वाढविण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर पासून शहरातील विविध मार्गावर बसची संख्या वाढविण्यात येणार आहे.

अटल सेवेला चांगला प्रतिसाद
पीएमपीच्या वतीने दसर्‍यापासून अटल योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 10 ते 12 हजार प्रवाशांनी प्रवास केला. या योजनेते 5 रुपयांत 5 किलोमीटर प्रवास करता येणार आहे. सध्या शहराच्या मध्यवस्तील 9 मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment