Home नांदेड भूमीपुत्र डॉ. नरेश देवनीकर यांच्या पुढाकाराने सहा वर्षा नंतर उप जिल्हा रुग्णालय...

भूमीपुत्र डॉ. नरेश देवनीकर यांच्या पुढाकाराने सहा वर्षा नंतर उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे नेत्र शस्त्रक्रियांचा आरंभ.

121
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0088.jpg

भूमीपुत्र डॉ. नरेश देवनीकर यांच्या पुढाकाराने सहा वर्षा नंतर उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे नेत्र शस्त्रक्रियांचा आरंभ.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

दि.30/09/2023:— शनिवार उपजिल्हा रुग्णालय, देगलूर येथे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या हस्ते नेत्र शस्त्र क्रिया ग्रुहाचा शुभारंभ झाला . भूमिपुत्र
वैद्यकीय अधिक्षक डॉ. देवनीकर नरेश यांच्या पुढाकारातुन व मार्गदर्शनाने सहा वर्षा पासुन तांत्रिक कारणाने बंद असलेल्या नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया आज सुरु झाल्या. नेत्र चिकित्सक डॉ. एस. तहाडे सर यांनी पाच शस्त्रक्रिया केल्या. या साठी स्टाफ मधील श्रीमती पांचाळ सिस्टर, श्रीमती मोमीन सिस्टर, शिवाजी पवार ब्रदर, श्री कसबे सर,श्री माजरामकर सर , श्री जमील मामा यांनी कर्तव्य पार पाडले . नेत्र शस्त्रक्रिया गृह सुरू झाल्याने रुग्णांना डोळ्याच्या मोतीबिंदू शस्त्र क्रियासाठी इतरत्र न जाता इथेच रुग्णांची सोय होणार आहे असे प्रतिपादन डॉ. नरेश देवनीकर यांनी करून भुमीपुत्र या नात्याने अशा अनेक आरोग्य सुविधा गोर गरीब गरजू रुग्णांना देण्याचा मानस पुर्ण करणार असल्याचे सांगितले .
तसेच आयुष्मान भव: या अभियाना अंतर्गत रक्त दान शिबिर घेण्यात आले . रक्त दात्यांनी उत्स्फूर्त पणे रक्त दान करून जीवन दान देण्याचे मोलाची भुमिका निभावली .
या प्रसंगी आयुष्मान भव: योजनेची, MJPJY व PMJAY याची माहिती डॉ. संजय लाडके आणि आरोग्य मित्र श्री शेख अहेमद यांनी दिली. लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवनिकर , डॉ. मिलिंद शिकारे, डॉ. विश्वनाथ मलशेटवार, डॉ. अनिल थडके, डॉ.संभाजी पाटिल, डॉ. शेख मुजीब, अधीपरीचारिका मनीषा बोईनवाड, स्टाफ आणि कर्मचारी ई उपस्थित होते . या प्रसंगी २८० रूग्ण तपासणी करून ओषधी वाटप करण्यात आले.

Previous articleमुक्रमाबाद भवानी चौकात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी साजरी
Next articleनवरगाव ग्रामपंचायत तर्फे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबवून गाव केला स्वच्छ।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here