• Home
  • 🛑 कंगनाने पातळी सोडली….! मुखमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली 🛑

🛑 कंगनाने पातळी सोडली….! मुखमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली 🛑

🛑 कंगनाने पातळी सोडली….! मुखमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई -⭕ शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र कंगनाने तलवार म्यान केली नसल्याने हा वाद चिघळताना दिसतोय.

अशातच आज बीएमसीतर्फे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांनी कंगनाची कार्यालयाचा काही भाग अतिक्रमण असल्याचे सांगत पाडला.

बीएमसीच्या या कारवाईनंतर आता कंगनाने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. याबाबत तिने एक व्हिडीओ ट्विट केला असून यामध्ये ती मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख करत असल्याचं दिसतंय.

व्हिडिओमध्ये बोलताना तिने, ‘उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? तू फिल्म माफियांशी हातमिळवणी करून माझं घर तोडून खूप मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर तोडलं आहे मात्र उद्या तुझी घमेंड मोडेल. हे वेळेचे चक्र आहे. लक्षात ठेव वेळ कधीच सारखी नसते. मला असं वाट की तू माझ्यावर फार मोठा उपकार केला आहेस.

मी आज काश्मिरी पंडितांना काय यातना झाल्या असतील हे समजू शकते. मी देशाला वाचन देते की मी केवळ अयोध्याचं नाही तर काश्मीरवरही एक चितपट बनवेन.

आणि माझ्या देशवासियांना जागृत करेन. जे माझ्यासोबत झालं त्याच्यामागे काही अर्थ आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!’ अशी भूमिका मांडली आहे…⭕

anews Banner

Leave A Comment