Home पुणे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेद न पाहता सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे...

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेद न पाहता सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली : वृक्षमित्र अरुण पवार

60
0

आशाताई बच्छाव

20230926_092000-BlendCollage.jpg

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेद न पाहता सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली : वृक्षमित्र अरुण पवार
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध दिली, हे मोठे समाजपरिवर्तन होते. आज मात्र शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे, असे मत मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालय (वेताळे, ता. खेड) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य बी. एस. जाधव, सरपंच सविताताई बोंबले, उपसरपंच रेखा राव, माजी सरपंच बंडूशेठ बोंबले, विद्यार्थी मंचचे अध्यक्ष ऍड. संभाजी मिंडे, पोलीस पाटील सयाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अमोल लोंढे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी वाळुंज, केंद्रप्रमुख आशा बोंबले, स्कूल कमिटी सदस्य विठ्ठल बोंबले, संदीप बोंबले, कैलास नाईकडे, देविदास बोंबले, केतन चव्हाण, दत्तात्रेय बोंबले, अमोल लोंढे विठ्ठल बोंबले, तुकाराम बोंबले, योगेश बोंबले, कविताताई बोंबले, शुभांगीताई बोंबले, नीलिमाताई गोपाळे, बबन कोबल, प्रियांकाताई देवदरे, ज्योतीताई सुपे, मुख्याध्यापक बीएल रणपिसे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.आदी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणासोबतच स्वावलंबनाचे बाळकडू देऊन युवा वर्गामध्ये स्वाभिमान व आत्मविश्वास निर्माण केला. शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाड्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत त्यांनी पोहोचवली. प्रत्यक्ष कृतीतून समाजप्रबोधन घडवून आणणारे कृतिशील समाजसेवक, बहुजनांना ज्ञानामृत पाजणारे ज्ञानमहर्षी ते होते.
वृक्षमित्र अरुण पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे लावा, झाडे जगवा, देश वाचवा’ संदेश देत देशी झाडे व फळांची शंभर झाडे भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here