Home गडचिरोली गडचिरोली मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या चुरचुरा येथील महिलेस वाघाने केले ठार..

गडचिरोली मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या चुरचुरा येथील महिलेस वाघाने केले ठार..

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0062.jpg

गडचिरोली मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या चुरचुरा येथील महिलेस वाघाने केले ठार..

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात 29 ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला करुन शेतकऱ्यास ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज 30 ऑगस्ट रोजी एन हरतालीका दिनी गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या पोर्ला वनक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या चुरचुरा जंगल परिसरात आपल्या पतीसह गुरे चारण्याकरीता गेली असता गुराखी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकिस आली पार्वता नारायण चौधरी (60)असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,पार्वती नारायण चौधरी हि जंगल परिसरात आपल्या पतीसह गुरे चारण्याकरीता गेली होती. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वता चौधरी वर हल्ला करून नरडिचा धोट घेतला यात ती ठार झाली घटनेची माहिती गावकर्यांनी वनविभागाला दिली.

जिल्हात दिवसेदिवस वाघाचे मानवावरील हल्ले वाढत असल्याने मानव वन्यजीवन संघर्ष होण्याची शक्यता असुन नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी वांरवार मागणी नागरीकांकडुन करण्यात येत आहे.माञ वनविभाग यात सपसेल अपयशी ठरत आहे.सततच्या घटनेने वनविभागाप्रती नागरिकांकडुन संताप वेक्त करण्यात येत आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटिल यांची गडचिरोली येथे कार्यकारणी बैठक
Next articleपर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here