Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटिल यांची गडचिरोली येथे कार्यकारणी बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटिल यांची गडचिरोली येथे कार्यकारणी बैठक

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0061.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटिल यांची गडचिरोली येथे कार्यकारणी बैठक          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी आज गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी मा. प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे. या भागात चांगली नोंदणी व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपले राजकारण बेरजेचे असल्याने आपल्या पक्षाची दारं सदैव येणाऱ्यांसाठी उघडी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त लोक जिंकून आणायचे आहेत, असे मार्गदर्शन जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

जिल्ह्यातील पक्ष संघटनेबाबत आपण चिंतन करायला हवे. क्रियाशील सदस्यांची संख्या आपल्याला वाढवली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या भागात प्रयत्न करा, लोकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसविषयी विश्वास निर्माण करा. आपला पक्ष तरुणांचा पक्ष आहे, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना धर्माबाबांसारख्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आहे. आपण हा जिल्हा राष्ट्रवादीमय करू शकतो, असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

पूर, अतिवृष्टीने तुमचा भाग त्रस्त आहे. मला समाधान आहे की या संकटाच्या काळात आपण त्या नागरिकांच्या सोबत उभे राहिलात. मला सर्व कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, असे कौतुक प्रदेशाध्यक्षांनी केले.

कोण येतं, कोण जातं याचा विचार न करता आपल्या पक्षाला बळकटी कशी मिळेल याचा विचार आपण करायला हवा, असे मत माजी राज्यमंत्री धर्माबाबा आत्राम यांनी व्यक्त केले. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत यश संपादित करून आपल्याला पक्षाची ताकद वाढवायची आहे. जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये आपण काम केले तरच आपल्याला लोकसभेत तग धरता येईल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतो. मागे सिरोंचा येथे पूर आला त्यावेळी १८ तास प्रवास करून आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेलो. भाजपचे लोक सर्व झाल्यानंतर तिथे आले आणि फोटो सेशन करून गेले, असा टोला आत्राम यांनी विरोधकांना लगावला.

गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपण आपल्या संघटनेवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. या भागातील दोन्ही नगरपरिषदा आपण जिंकू शकतो. रडून उपयोग नाही आता लढावे लागेल. सध्याचे सरकार काही चांगल्या मार्गाने आलेले नाही. कपटाने केलेल्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. अशा परिस्थितीत आपण तयारीला लागायला हवे. अंतर्गत गटबाजी सोडून एकदिलाने काम करायला पाहिजे. एकीची वज्रमुठ करा आणि लढा द्या, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, महिला अध्यक्ष शाहीन हकीम, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भराडकर, युवक प्रदेशाध्यक्ष नितीन भरारकर, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश पोरंडीवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous articleअहेरी नगरपंचायत अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून गुन्हा दाखल करा..!!
Next articleगडचिरोली मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या चुरचुरा येथील महिलेस वाघाने केले ठार..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here