Home भंडारा क्रिकेट खेळण्याच्या नादात आरोपी करण बिलवणे यांनी मृतक निवृत्तीनाथ कावळे यांचा घेतला...

क्रिकेट खेळण्याच्या नादात आरोपी करण बिलवणे यांनी मृतक निवृत्तीनाथ कावळे यांचा घेतला बळी

2177
0

आशाताई बच्छाव

IMG_20231105_181818.jpg

क्रिकेट खेळण्याच्या नादात आरोपी करण बिलवणे यांनी मृतक निवृत्तीनाथ कावळे यांचा घेतला बळी

अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली टोली गावातील घटना

पोलिसांचे तपास चक्र सुरू

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली टोली येथील गावात आज दिनांक 5 नोव्हेंबर ला १.३० वाजेच्या सुमारास दोन खेळाडू मध्ये आपसात वाद होऊन तो वाद इतका विकोपाला गेला की ,आरोपी नामे करण रामकृष्ण बिलवणे वय 21 राहणार चिखली तालुका पवनी जिल्हा भंडारा व मृतक नामे निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे वय 24 राहणार चिखली तालुका जिल्हा भंडारा दोघेही एकाच गावचे रहिवासी असून घटनेच्या दिवशी मौजा चिखली टोली येथील खुल्या ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळत होते .क्रिकेट खेळत असताना मृतक व आरोपी हे इतर मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना मृतक व आरोपी यांचा पुन्हा एक मंच खेळू द्या या कारणावरून मृतक व आरोपी यांच्यात दोन दोन गोष्टी झाल्या. या कारणावरून आरोपीने मृतकाच्या हातातील क्रिकेट खेळण्याचे बॅटने मृतकाच्या पायावर मारले तेव्हा मृत खाली वाकला. त्याच वेळी आरोपीने पुन्हा बॅट मृतकाला मारण्यास उगारली असता मृतकाच्या मानेवर जाये बाजूला लागली. त्यामुळे मृतक जागेवर बेसुद्धा पडला .त्यास उपचाराकरिता ग्रामीण रुग्णाल अड्याळ येथे भरती केले असता उपचारादरम्यान मरण पावला. फिर्यादी प्रसाद रामकृष्ण धरमसहारे वय 23 राहणार चिखली यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट व ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे . कायमी अपराध क्रम 242 /२०२३ कलम 302 भादवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे .पोउपनी हेमराज सोरते/ बन 401 यांनी दाखल केला असून तपास सपोनी राऊत करीत आहेत .

Previous articleचाळीसगावात प्राध्यापकाला संस्थाचालकांकडून मारहाण
Next articleमराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here