Home जळगाव चाळीसगावात प्राध्यापकाला संस्थाचालकांकडून मारहाण

चाळीसगावात प्राध्यापकाला संस्थाचालकांकडून मारहाण

306
0

आशाताई बच्छाव

IMG_20231105_080454.jpg

चाळीसगावात प्राध्यापकाला संस्थाचालकांकडून मारहाण
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- आमच्या विरूद्ध खोटेनाटे आरोप करतो या कारणावरून शहरातील एका शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकाला संस्थाचालकासह त्यांच्या मुलाने व इतरांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
येथील एका महाविद्यालयात कार्यरत 45 वर्षीय प्राध्यापक दि.2 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास धुळे रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ दुचाकीजवळ उभा असतांना त्याच संस्थेतील चेअरमनसह त्यांचा मुलगा इतर तेथे आले व त्यांनी तु आमच्या विरूद्ध खोटेनाटे आरोप करतो असे म्हणत प्राध्यापकाला शिवीगाळ केली.तसेच प्राध्यापकांच्या दुचाकीला लाथ मारल्याने प्राध्यापक खाली पडले.त्यावेळी एकाने लोखंडी सळईने मांडीला मारून दुखापत केली.तसेच शिवीगाळ करून चापटाबु्न्नयांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे प्राध्यपकाने दिेलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्राध्यापकाने फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सहा जणांच्या विरोधात भादंवि कलम 324, 323, 504, 506, 427, 143, 144, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here