Home नांदेड पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

133

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0010.jpg

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 30 :- बुधवार 31 ऑगस्ट रोजी श्री गणेशाची स्थापना होवून गणपती उत्सवास सुरवात होत आहे. 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार पाण्याचे प्रदुषण होवू नये म्हणून पीओपीच्या गणेश मूर्ती नदी पात्रात विसर्जन करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. गणेश भक्तांनी व सार्वजनिक गणेश मंडळानी पीओपीच्या गणेश मूर्ती व निर्माल्य गोदावरी व आसना नदीत विसर्जित न करता मनपाच्या संकलन केंद्राकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने सांगवी (आसना नदी) आणि पासदगाव या दोन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात घरघुती लहान व मध्यम आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असे त्यांनी सांगितले आहे. तसेच मोठया गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था नानकसार गुरुद्वारा साहिब झरी (खदान) या तलावात करण्यात आली आहे. श्री गणेश मूर्तीच्या संकलनासाठी मनपाच्यावतीने क्षेत्रिय कार्यालय क्र. 1 व 6 अंतर्गत मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मनपाच्यावतीने नेमण्यात आलेल्या ठिकाणी गणेश भक्तांनी व गणेश मंडळानी कर्मचाऱ्यांकडे आपली गणेश मूर्ती सुपूर्द कराव्यात असे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले. या कामासाठी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दोन सत्रात नेमणूक करण्यात आली आहे. पासदगाव, सांगवी येथील कृत्रिम तलावात तसेच नानकसर गुरुद्वारा साहिब झरी (खदान) येथे श्री गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जनासाठी आवश्यक टेम्पो (आयचर), क्रेन, टाटा-एस व इतर आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Previous articleगडचिरोली मुख्यालयापासुन 15 किं.मी अंतरावर असलेल्या चुरचुरा येथील महिलेस वाघाने केले ठार..
Next articleगणेशोत्‍सव देखावा सजावट स्‍पर्धा 2022 माझा गणेशोत्सव माझा मताधिकार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.