Home नांदेड उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे मोफत आरोग्य मेळावा संपन्न.

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे मोफत आरोग्य मेळावा संपन्न.

53
0

राजेंद्र पाटील राऊत

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे मोफत आरोग्य मेळावा संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क) दि १८/०४/२०२२ रोजी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुखेडचे लोकप्रिय आमदार मा डॉ तुषारजी राठोड साहेब, उद्घाटक माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार व प्रमुख उपस्थिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भोसीकर सर, मुखेड भूषण डॉ दिलीप पुंडे सर, उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ सुधाकर तहाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा शाल/हार देऊन यथोचित सन्मान रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आला. प्रस्तावना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भोसीकर सर यांनी केली, त्या नंतर डॉ दिलीप पुंडे सर व नगराध्यक्ष देबडवार सावकार यांची भाषणे झाली, अध्यक्षीय समारोप मा आमदार डॉ तुषारजी राठोड साहेब यांनी केला. आभार प्रदर्शन डॉ रमेश गवाले यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय मुखेड सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात उद्दीष्ट पूर्ण करून जिल्ह्यात अव्वल स्थानावर आल्याबद्दल वैद्यकीय अधिक्षक डॉ सुधाकर तहाडे व त्यांच्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मान्यवरांनी केले. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचे कार्ड मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार श्री काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी श्री तुकाराम भालके , cdpo श्री नागमवाड, श्री बामणे, डॉ माधव पाटील उच्चेकर, जगदीश बियाणी, राजू घोडके, अशोक गजलवाड, चंद्रकांत गरुडकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, खुशाल पाटील उमर्दरिकर, विनोद दंडलवाड, किशोर चव्हाण, डॉ हीमगिरे, घोगरे, अनिल कांबळे, मैनुद्दीन, पत्रकार बंधू, प्रतिष्ठित नागरिक, तालुक्यातील अधिकारी/ कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात ६२७ रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला. रक्तदान शिबिरात २८ बॅग रक्त संकलन केले. १८८ नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला. ७६ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. तज्ञ वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी,RBSK,NCD डॉक्टर्स नी रुग्णांची तपासणी व समुपदेशन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here