• Home
  • देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतींच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी देणार आमदार रावसाहेब अंतापूरकर यांची घोषणा..

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतींच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी देणार आमदार रावसाहेब अंतापूरकर यांची घोषणा..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201226-WA0146.jpg

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतींच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी देणार आमदार रावसाहेब अंतापूरकर यांची घोषणा..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बिलोली सध्या चालू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या गावातील इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या यातून निर्माण होणारी गटबाजी दुरावा वेळ व पैशाची नासाडी टाळण्यासाठी तसेच गावातील असलेले सलोख्याचे वातावरण कायम रहावे एकजुटीने गावचा विकास व्हावा .यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूकही बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी व्यक्त केली. देगलूर बिलोली मतदार संघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निघतील अशाच ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी 5 लाख रुपयांचा निधी देणार अशी घोषणा आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी केली. भविष्यात देखील त्या गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले. बिलोली तालुक्यातील 73 ग्रामपंचायती पैकी 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील पाचपिपळी कर पांडुरंग पाटील रामपुरे दिलीप पाटील पांढरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment