Home नाशिक स्वराज्य संघटनेच्या मार्फत सामान्य जनतेची कामे करणार मा.खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन..

स्वराज्य संघटनेच्या मार्फत सामान्य जनतेची कामे करणार मा.खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन..

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20230910-WA0030.jpg

स्वराज्य संघटनेच्या मार्फत सामान्य जनतेची कामे करणार

मा.खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन..

येवला – लासलगाव मतदारसंघातील पहिल्या ‘स्वराज्य’ शाखेचे गोंदेगांवमध्ये उद्घाटन.

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यासाठी स्वराज्याची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे खोळंबलेली सामान्य जनतेची कामे मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. येवला – लासलगाव मतदार संघातील पहिल्या स्वराज्य शाखेच्या फलकाचे अनावरण त्यांनी गोंदेगाव (ता.निफाड) येथे केले ; त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर संपर्क प्रमुख करण गायकर, राज्य उपाध्यक्ष विनोद साबळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, सचिव शिवाजी मोरे, विजय वाहूळे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, जिल्हाप्रमुख रुपेश नाटे, महिला आघाडी प्रमुख मनोरमा पाटील, पुष्पाताई जगताप, आदी उपस्थित होते.
टाळ मृदुंगाच्या गजरात आणि सजविलेल्या बैलगाडीतून छत्रपती संभाजी राजेंची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढी पुतळ्यास अभिवादन करून स्वराज्य संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनंतर झालेल्या समारंभात संभाजी राजे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की,’ शेतकरी, कामगार, शिक्षण, सहकार आणि आरोग्य या पंचसूत्रीवर ही संघटना अवलंबून असून शासनदरबारी या संघटनेच्या माध्यमातून जनतेची कामे करण्यात येणार आहेत. इतर पक्षांप्रमाणे केवळ राजकारण करणे हा या संघटनेचा उद्देश नसून सुराज्य ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून गोरगरिबांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना कटिबद्ध असेल. सामान्य जनतेचा थेट संपर्क माझ्याशी असल्याने ही संघटना बेधडक काम करेल. ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे स्वराज्य’ या विचारातून संघटनेचे कामकाज असल्याने संघटनेचा नावलौकिक वाढण्यासाठी शाखाप्रमुखांनी काम करावे,असे त्यांनी सांगितले. यावेळी तात्या बाबा भोसले गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच अनिल रणशूर, जगदीश भोसले, , योगेश भोसले, निलेश भोसले, प्रमोद नाईक, शांताराम कांगणे, प्रवीण नाईक, प्रमोद भोसले ,संजय कांगणे, माधव जगताप, धिरज भोसले, नितीन निकम, दिनेश जगदाळे, महेश मेथे, भाऊसाहेब मोरे, बापू भोसले, आनंद भोसले, सचिन कांगणे, राजु काका भोसले, रामा भोसले, निलेश चिखले, ज्ञानेश्वर वैद्य आदी यावेळी शाखा प्रमुख अमोल भोसले उपशाखा प्रमुख सोमनाथ जुगृत खजिनदार प्रमोद नाईक, सचिव किरण कांगणे, गणेश साळवे, प्रसिद्ध प्रमुख चंद्रकांत जगदाळे उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.
संभाजी राजे हे काल दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून लासलगाव – येवला मतदार संघात त्यांनी आज २५ शाखांचे उद्घाटन केले असल्याची माहिती संपर्क प्रमुख करण गायकर यांनी दिली.

Previous articleनैताळे येथे मराठा आरक्षणासाठी सरणावर बसून आमरण उपोषणास सुरुवात
Next articleवारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला समन्वयक पदी सौ मनिषाताई भोर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here