Home रत्नागिरी पेडणेकर कुटुंबियाच्या या बाप्पाला दर दिवशी तब्बल ३० ताटांचा नैवेद्य दाखविला जातो

पेडणेकर कुटुंबियाच्या या बाप्पाला दर दिवशी तब्बल ३० ताटांचा नैवेद्य दाखविला जातो

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0037.jpg

पेडणेकर कुटुंबियाच्या या बाप्पाला दर दिवशी तब्बल ३० ताटांचा नैवेद्य दाखविला जातो                            रत्नागिरी,(सुनील धावडे)

मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथील समीर पेडणेकर आणि त्यांच्या एकत्रित कुटुंबातील गणपती आगळ्यावेगळ्या परंपरेच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत. पेडणेकर कुटुंबियाच्या या बाप्पाला दर दिवशी तब्बल ३० ताटांचा नैवेद्य दाखविला जातो. यामुळे हा गणपती बाप्पा तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणपती म्हणून गणला गेला आहे.
मसुरे कावावाडी येथील सहा जणांचे पेडणेकर कुटुंबिय गणेश चतुर्थीनिमित्त एकत्रित येत मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात. यावेळी प्रत्येक कुटुंबाची पाच ताटे अशी एकूण तीस ताटांचे प्रती दिवशी नैवेद्य दाखविण्यात येतो. कावाडीतील पेडणेकरांचे घर हे सर्वात मोठे घर म्हणून ख्याती आहे. या घराची लांबी एकशे दहा फूट असून रुंदी पंचावन्न फूट आहे. या गावात गणपतीला आलेला मुबंईतील चाकरमानी सुद्धा न चूकता भेट देतो. कारण व्यावसाईक रंगभूमीवरील नाट्य निर्माते दिनू पेडणेकर यांचे हे घर आहे.पेडणेकर कुटुंबियांच्या या मानाच्या गणपतीला तीस नैवेद्याची ताटे बनविण्यापूर्वी जेवणातील पदार्थ सुद्धा अगोदर सर्व महिला विचारविनिमय करून ठरवितात. जेणेकरून कुठलाही पदार्थ डबल होऊ नये याची काळजीही रोज नित्यनियमाने घेतली जाते. त्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या व गोड पदार्थ खायला मिळतात. गणपतीला नैवेद्य दाखविल्यानंतर नैवेद्याची ताटे घेऊन कुटुंबियांची तसेच आलेल्या पाहुण्यांची पंगत बसते. या पंगतीला अगोदर पुरुष मंडळी लहान मुलं आणि घरातील स्त्रिया जेवायला बसतात

Previous articleरत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन
Next articleमांडवकरवाडी प्रीमियर लीग चिखली स्पर्धेचे विजेते राऊत ब्रदर्स
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here