Home अमरावती तथागत गौतम बुद्धाच्या अस्थिकलशाचे अमरावती करांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप.

तथागत गौतम बुद्धाच्या अस्थिकलशाचे अमरावती करांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप.

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_204510.jpg

तथागत गौतम बुद्धाच्या अस्थिकलशाचे अमरावती करांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप.
———
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच जागतिक धम्म परिषदेच्या अनुषंगाने श्रीलंकेतील तथागत गौतम बुद्धाच्या अस्थी शहरात आणण्यात आल्या होत्या. या अस्थी कलाशाची शहरातून अभिवादन पदयात्रा निघाली. यावेळी अमरावती करांनी या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. सायन्स कोर मैदान येथील दोन दिवसीय या धम्म परिषद मध्ये भिकू संघाच्या वतीने उपस्थिती आण्णा धम्मदेसना देखील देण्यात आली. रविवारी दुपारी तीन वाजता सार्वजनिक दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. परियती फाउंडेशन व जागतिक धम्म परिषद कृती समितीच्या वतीने अमरावतीमध्ये पहिल्यांदा जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तर धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्रीलंका येथील भदंत मानापहा सुबोधि वंशाथेरोहे होते. तर अतिथी म्हणून भदंत नागसेन, भदंत शीलधन, भदंत रत्नपाल, भदंतनंद घोष, मुख्य आयोजक प्रमोद इंगळे, राजेश वानखडे ,रवींद्र वैद्य, प्रकाश बनसोड, साहेबराव वानखडे ,किरण गुडदे ,अंकुश आठवले ,सुनील रामटेके ,नितीन कदम, विनोद इंगळे, आदी मान्यवर धम्मपिठावर विराजमान होते. या धम्म परिषद च्या उद्घाटन पूर्वी शहरातून असती कलाशाची अभिवादन रॅली काढण्यात आली. यात्रा डॉ. आंबेडकर चौक, जस्तंभ चौक, राजकमल चौक मार्ग रुक्मिणी नगर सायन्स कोर मैदान पोहोचली. यात्रेत देश विदेशातील भदंत, हजार धम्म उपासक व उपाशी का पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. दोन दिवशी या धम्मपरिषद मध्ये बेसना देण्यात आली तसेच रविवारी दुपारी हजार धम्म उपासक तथागत गौतम बुद्धाचे अस्थि कलर सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. सायंकाळी चलो बुद्ध की और या गीत गायन कार्यक्रम धम्मपरिषद ची सांगता झाली.

Previous articleपात्र असूनही घरकुल योजनेपासून डावलल्याने पंचायत समिती समोर बेमुदत संप
Next articleआजचा विद्यार्थी भरकटतोय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here