आशाताई बच्छाव
शेतातील फवारणी संदर्भात दुबळवेल येथे कृषीदुताकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
युवा मराठा न्युज प्रतिनिधी रितेश गाडेकर
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,संलग्नित कृषी महाविद्यालय आमखेडा येथिल कृषिदुत ओमकेश गावंडे,वैभव शिंदे,गोपाल इंगळे,बलराम चौधरी,ईश्वर अहिर यांनी दुबळवेल येथे शेतात जाऊन येथील शेतकऱ्यांना फवारणी करताना दक्षतेसंबंधी कोणती काळजी घ्यावी, याबाबत 12 ऑगस्ट रोजी मार्गदर्शन केले.बऱ्याचदा शेतात फवारणी करताना शेतकरी आवश्यक ती खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे त्वचेचे आजार, डोळ्यांना इजा, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणली. व तसेच वनस्पती वाढ नियामक (PGR), आणी किटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक ही करून दाखवले,या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालय आमखेडा येथील प्राचार्य डॉ.एस ए. काळे,डॉ.आर.एस.करंगामी कार्यक्रम समन्वयक तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.एस टी.जाधव, प्रा.एम पी.सुरशे तसेच विषयतज्ञ प्रा.प्रतीक जी.नागपूरे,प्रा.अरुण के.वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.