Home उतर महाराष्ट्र शिर्डी साईबाबा संस्थान प्रसादालय चे दोन आचारीना राष्ट्रपती यांनी स्वतः राष्ट्रपती भवनात...

शिर्डी साईबाबा संस्थान प्रसादालय चे दोन आचारीना राष्ट्रपती यांनी स्वतः राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले.

154
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230729-210920_WhatsApp.jpg

शिर्डी साईबाबा संस्थान प्रसादालय चे दोन आचारीना राष्ट्रपती यांनी स्वतः राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले. राहाता प्रतिनिधी मोहसीन तांबोळी                नुकताच राष्ट्रपती यांचा शिर्डी दौरा पार पडला शिर्डीला आल्यानंतर बाबांचे दर्शन घेऊन त्या साईबाबा संस्थान प्रसादालय येथे बाबांचा प्रसाद घेण्यासाठी आल्या तेव्हा त्यांच्यासाठी खास मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती साई प्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर महामहीम राष्ट्रपतींनी देखील जेवणाची विशेष तारीफ करत जेवणात बनवलेली शेंगदाणा चटणी आणि वडापाव स्वादिष्ट होता असे सांगितले व त्यांना संपूर्ण जेवणाबरोबर हे दोन पदार्थ विशेष करून आवडले.या पदार्थांची आठवण राष्ट्रपती महोदयांना स्वस्थ बसू देत नव्हती…म्हणून की काय… त्यांनी दिल्लीला गेल्यानंतर आपल्या राष्ट्रपती भवनाच्या किचन मधील मेनू मध्ये सुद्धा ह्या महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश असावा आणि त्यासाठी साईबाबा संस्थानचे आचारी थेट राष्ट्रपती भवनात बोलवावे असा विचार मनी आला असावा आणि त्यांनी चक्क साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांना निरोप पाठवत प्रसादालयाच्या त्या दोन्ही आचार्यांना राष्ट्रपती भवनात पाठविण्याची आदेशवजा सूचना करत निमंत्रण दिले आहे

हा ऐतिहासिक क्षण साईबाबा संस्थान,साई प्रसादालय व शिर्डीतील ग्रामस्थांसह लाखो साई भक्तांच्या अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण असून शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही आचार्यांचा सत्कार करण्यात आलाय.

शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी संकल्पना मांडत शिर्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवनाऱ्या या दोघा आचार्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्याचे ठरविले व हॉटेल टेंपल व्हिव येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर,माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते,भाजपचे माजी शहराध्यक्ष सचिन शिंदे,राष्ट्रीय समाज पक्षाचे नानासाहेब काटकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले,माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर,मुस्लिम समाजाच्या वतीने गणी भाई पठाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर उपस्थितांमध्ये जेष्ठ नेते बाबासाहेब कोते,ज्ञानेश्वर गोंदकर,विलास आबा कोते,गोपीनाथ गोंदकर,नारायण लुटे,अशोक गायके,अमोल गायके, डॉ. नचिकेत वर्पे,विनोद संकलेचा,मेहमूद सय्यद,समीर शेख,दत्तू कोते,गणेश कोते,चेतन कोते,प्रकाश गोंदकर,साई गोंदकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleलायन्स क्लबच्या कॅबिनेटपदी मोहन इंगळे यांची निवड
Next articleहोट्टल ते देवापूर, येरगी जाणाऱ्या पुलाची दुर्दशा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here