Home जालना लायन्स क्लबच्या कॅबिनेटपदी मोहन इंगळे यांची निवड

लायन्स क्लबच्या कॅबिनेटपदी मोहन इंगळे यांची निवड

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20230729-WA0070.jpg

लायन्स क्लबच्या कॅबिनेटपदी
मोहन इंगळे यांची निवड
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः जालना येथील लायन्स क्लबच्या कॅबिनेटपदी शहरातील युवा उद्योजक मोहन इंगळे यांची निवड करण्यात आली असून उद्या दि. 30 जुलै रविवार रोजी औरंगाबाद येथील एमजीएम परिसरातील रूख्मीनी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शपथग्रहन होणार आहे.
जालना शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले मोहन इंगळे यांनी उद्योग व्यवसायात देखील आपले नाव लौकीक केले आहे. त्यांच्या या कार्याची  दखल घेवून त्यांची जालना लायन्स डायमंडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या दोन वर्षाच्या कार्यकाळात लायन्स डायमंडच्या माध्यमातून त्यांनी अन्य सहकारी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून जालना शहर व ग्रामीण भागात अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय अनेक गोर-गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ते पुढाकार घेत असतात. दोन वर्षात राबवलेले उल्लेखनिय कार्य लक्षात घेवून मोहन इंगळे यांची आता लायन्स क्लबचे प्रांतपाल सुनिल देसरडा यांनी लायन्स क्लबच्या कॅबिनेट पदी नियुक्ती केली आहे. उद्या दि. 30 जुलै रविवार रोजी औरंगाबाद येथील  रूख्मीनी सभागृहात लायन्स क्लबचे प्रांतपाल सुनिल देसरडा यांच्या अध्यक्षतेखाली तर आंतरराष्ट्रीय संचालक तथा द लायनचे संपादक ला. डॉ. नवल मालु, केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, मराठी चित्रपटातील प्रसिध्द सिनेअभीनेत्री निशिगंधा वाड, ला. श्रावनकुमार, ला. राजशेखर कापसे, ला. बलबिरसिंग विज यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्याचे लॉयन कॅबिनेट सदस्य मोहन इंगळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहन सोहळा होणार आहे. या निवडीबद्दल मोहन इंगळे यांचे मित्र परिवारांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
———–�

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here