Home भंडारा शेतकरी ,शेतमजूर, विधवा महिलांच्या, मागण्या करिता सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वात रामटेक तहसील...

शेतकरी ,शेतमजूर, विधवा महिलांच्या, मागण्या करिता सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वात रामटेक तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा

44
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-061422_WhatsApp.jpg

शेतकरी ,शेतमजूर, विधवा महिलांच्या, मागण्या करिता सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वात रामटेक तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा

नागपूर( संजीव भांबोरे) –विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांचे नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील कार्यालयावर दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ला विशाल मोर्चा काढण्यात आला .काढण्यात आलेल्या प्रमुख मोर्चाच्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती करण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकरी, शेतमजू,र निराधार, श्रावणबाळ विधवा महिला, दिव्यांग यांना किमान सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत सन 1994 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मासिक महिना 6000 रुपये देण्यात यावा, शेतकऱ्यांना 2006 मध्ये पारित झालेल्या स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा ,शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावेत, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे वयाची अट 65 वरून 60 करण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकरी देण्यात यावी ,महागाई ,पेट्रोल, डिझेल, यांच्या किमती कमी करण्यात यावे , भूमिहीन शेतमजुरांना पट्टे देण्यात यावेत व त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी ,शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये 25 टक्के आरक्षण देण्यात यावेत सिलेंडरच्या किमतीत घट करण्यात येऊन चारशे रुपयांना देण्यात येऊन महिलांचा सन्मान करण्यात यावा धानाला बोनस जाहीर करण्यात यावे, वरील मागण्यांचे निवेदन तहसीलदार रामटेक यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री , ऊर्जामंत्री व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले .वरील मागण्या मान्य न झाल्यास विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भीकमांगो आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी सर्वस्वी शासन व प्रशासनाची राहील. निवेदन देताना शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे, उपाध्यक्ष नम्रता बागडे , सीमा सरनागत ,पौर्णिमा खांडेकर ,विजया बागडे ,सुनिता राऊत ,सुमित्रा देव्हारे ,चरण बर्वेकर ,गुलाब रंधवे, सुनील गईगये ,बाबुराव मोहारे, टीकाराम रहाटे ,निलेश बारस्क,र छाया कोकोडे ,जयश्री हटवार, सुनिता राऊत , पार्वता नेवारे ,पंचशीला पोचपोगडे ,श्यामकला सरनागत शिला सलामे, रामकला सरनागत ,स्वाती वासनिक व असंख्य कार्यकर्ते यावेळेस प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous article“कहालकर दवाखाना” तर्फे तीर्थक्षेत्र आळंदी येथे मोफत “वैद्यकीय आरोग्य व सेवा शिबीर”
Next articleगोपाळ वस्ती मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे भोजनदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here