• Home
  • _*मालेगावात बनावट पासपोर्ट तयार करून फसवणुक करणारे टोळीचा पर्दाफाश – ०२ बांगलादेशी नागरीकांसह मालेगावातील ०६ आरोपी अटक*_

_*मालेगावात बनावट पासपोर्ट तयार करून फसवणुक करणारे टोळीचा पर्दाफाश – ०२ बांगलादेशी नागरीकांसह मालेगावातील ०६ आरोपी अटक*_

_*मालेगावात बनावट पासपोर्ट तयार करून फसवणुक करणारे टोळीचा पर्दाफाश – ०२ बांगलादेशी नागरीकांसह मालेगावातील ०६ आरोपी अटक*_
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. सचिन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हयातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार *मालेगाव शहरातील आयशानगर व पवारवाडी* पोलीस ठाणे हद्दीत *बनावट पासपोर्ट तयार करून देणारे ०६ संशयीत व ०२ बांगलादेशी* नागरीकांना ग्रामीण पोलीसांनी अटक करून कारवाई केली आहे.

दिनांक ०६/११/२०२० रोजी मालेगाव शहरातील आयशानगर व पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत संशयीत इसम नामे *१) आलम आमीन अन्सारी, वय ३८, मुळ रा. बांगलादेश,* व *२) ताहिरअली युसूफ अली, वय २५, मुळ राहणार – नईकुलसुरी, बांगलादेश,* यांचेसह मालेगाव शहरातील इतर ०६ संशयीत इसम असे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे दाखवुन, तसेच मालेगाव शहरातील रहिवासी असल्याचे भासवुन त्यावरून पासपोर्ट तयार करून भारत सराकारचे कुठलेही कायदेशीर परवानगी अथवा कागदपत्रे न करता *बेकायदेशीररित्या अवैध मार्गाने भारत देशात प्रवेशकरून व अनाधिकृतपणे वास्तव्य* करून भारत सरकारची फसवणुक करतांना मिळुन आले आहे. सदर दोन्ही बांगलादेशी नागरीक व मालेगावशहरातील ०६ संशयीत
इसमांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेविरूध्द *आयशानगर व पवारवाडी पोलीस ठाणेस* भादवि कलमांसह पासपोर्ट कायदा कलम १२(ब) प्रमाणे व नियम ०३ सह ०६ पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० परिच्छेद ३(१) परकिय नागरी आदेश १९४८ परकिय नागरी कायदा १९४६ कलम १४, ०२ (रिपोर्ट टू पोलीस) रूल २००१ प्रमाणे एकुण ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदर आरोपीतांकडे सखोल चौकशी केली असता त्यांचे कब्जातुन बनावट भारतीय
पासपोर्ट, मतदान कार्ड, जन्म दाखले, आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्रे (मालेगाव मनपा कडील नोंदणी असलेले), पॅन कार्ड, डाकघर बचत बॅकेतील पासबुक, लोकप्रतिनिधींचे लेटरहेडवरील शिफारसपत्रे अशी बनावटी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीतांना वरील गुन्हयांमध्ये अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे.

anews Banner

Leave A Comment