Home नाशिक मालेगांवात माहिती अधिकाराचा गैरवापर शिक्षक बांधव त्रस्त आंदोलनाचा दिला इशारा मालेगांव,

मालेगांवात माहिती अधिकाराचा गैरवापर शिक्षक बांधव त्रस्त आंदोलनाचा दिला इशारा मालेगांव,

197
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20230514-122842_Google.jpg

मालेगांवात माहिती अधिकाराचा गैरवापर शिक्षक बांधव त्रस्त आंदोलनाचा दिला इशारा मालेगांव,(विजय चांदणे प्रतिनिधी) -मालेगांव शहर व परिसरातील शासनमान्य शाळा व वर्ग तुकडयांना माहितीचा अधिकार वापरुन शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून वेठीस धरण्यासोबतच शाळा व्यवस्थापनाकडे आणि शासन स्तरावर वारंवार माहिती अधिकाराचा गैरवापर करुन शिक्षक बांधवाना त्रस्त करणाऱ्याविरुध्द प्रसिध्दी पत्रकाव्दारे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,आय.एस.टी.एफ.ह्या माध्यमिक संघटनेचा तथाकथित सेक्रेटरी गुफरान अन्सारी व त्याचे सहकारी हे गेल्या दोन वर्षापासून चुकीचे माहिती अधिकार वापरुन मालेगांव शहर व परिसरातील मराठी आणि उर्दू माध्यंमाच्या शाळेतील शिक्षकांना मानसिक त्रास देण्याबरोबरच छळवाद सुरु केला आहे.त्यामुळे गेल्या दहा ते बारा वर्षापासून सदरच्या शाळांवर विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना आता कुठे २०/.टक्के पगार सुरु होण्या अगोदरच सदर शिक्षकांच्या हितासाठी कार्यरत असल्याच्या नावाखाली चालणाऱ्या या संघटनेकडून मात्र माहिती अधिकाराचा गैरवापर करण्यात येऊन शिक्षकांना वेठीस धरले जात आहे.त्यामुळे आज अनेक शिक्षक बांधव प्रचंड मानसिक तणावात जीवन जगत असून,कुणाच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी आय.एस.टी.एफ.संघटनेचीच असणार असल्याची ठाम भुमिका शिक्षक कर्मचाऱ्यांनी घेतलेली असून,सदर माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करणाऱ्या आय.एस.टी.एफ.संघटना व पदाधिका-यांविरोधात १५ ते २० शाळातील शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना व मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिग्रेडकडे तक्रारी करुन लवकरच तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाचा इशारा असंख्य शिक्षकांसह वरील दोघाही संघटनानी प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.

Previous articleशेवरेत आदिवासी जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न
Next articleशेवरेत आदिवासी जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here