आशाताई बच्छाव
व-हाणे प्रकरणात राजेंद्र पाटील राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स
आजच बुधवारी कोर्टासमोर व्हावे लागणार हजर;आता होईल खरा पंचनामा…!
मालेगांव,(विजय चांदणे प्रतिनिधी)- युवा मराठाचे मुख्य संस्थापक संपादक तथा व-हाणे प्रश्नावर गत तीन वर्षापासून संघर्ष करुन लढा देत असलेले राजेंद्र पाटील राऊत यांनी न्यायालयात हजर रहावे असे समन्स आज पोलिसाकरवी बजावण्यात आले आहेत.
व-हाणे प्रकरणावर सन २०२२ साली राजेंद्र पाटील राऊत यांनी मालेगांव तालुका पंचायत समितीसमोर जाहिर आत्मदहन केल्याने,हे आत्मदहन का आणि कशासाठी करण्यात आले होते.याचे समर्पक पुरावे व उतरे आता प्रशासनाला न्यायालयापुढे द्यावे लागणार आहेत.
व-हाणे प्रकरण हा आता माझ्यासाठी साधरण नव्हे तर महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.जेथे गावच्या गाव अतिक्रमणित झाली.तेथे ग्रामपंचायत प्रशासन आजपर्यंत काही करु शकले नाही.तेथे माझ्या सामाजिक कार्याला अडथळा आणणाऱ्या भामटयांचा नकली चेहरा न्यायालयासमोर उघड केला जाईल.- राजेंद्र पाटील राऊत