Home पुणे चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0033.jpg

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली जाते. तशीच मोफत आरोग्यसेवा याही वर्षी पुरवण्यात आली. यात वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार देहू आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी महामार्गावर पुरविण्यात आले. यात दररोज हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला. या वारीत वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यात आपल्या सेवेचे योगदान देणारे डॉ. संतोष कदम, डॉ. ऋषी महाजन, डॉ. देविदास शेलार, डॉ. प्रियांका बाजड तसेच चंद्ररंग पॅरामेडिकलचे विद्यार्थी व सर्व सेवकांचा सत्कार ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ व लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने श्री साई सेवा कुंज आश्रम, कासारवाडी येथे आषाढी एकादशी निमित्ताने करण्यात आला.
पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेणे पुरेसे नसते. तर वारी अनुभवणे, वारकऱ्यांच्या संगतीत राहून त्यांची सेवा करत करत विठू नामाचा गजर करण्यात तल्लीन होणे, याची तुलना कुठल्याही सुखाशी होऊ शकत नाही. वारीत अखंड सहभागी होत, माझ्या सहकाऱ्यांसमवेत वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, आणि हे कार्य करताना मला प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचा आनंद मिळतोय. मलाही गेल्या वर्षी पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा डॉक्टर म्हणून पांडुरंगाच्या रूपातील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे, हे मी अहोभाग्य समजतो, असे डॉ. देविदास शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्राला वारीचे जे आकर्षण वाटते, ते विशेषत: संतांच्या पालख्यांमुळे. पूर्वीच्या काळी एखाद्याला पालखीपदस्थ करणे, हा सर्वांत मोठा सन्मान होता. आता तर लाखो वारकरी आणि त्यांचे कुटुंबीय यात सहभागी होतात. अगदी परराज्यातून, परदेशातून देखील उत्सुकतेपोटी अनेक जण वारीच्या प्रवासात येतात. या सर्वांचीच कुठल्याही प्रकारची आरोग्य समस्या येऊन गैरसोय होणार नाही याची काळजी लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवक त्यांच्या परीने घेत होते.
पांडुरंगाच्या वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून करत असलयाचे ट्रस्टचे अध्यक्ष शंकर जगताप बंधू विजय जगताप यांनी सांगितले.
यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, दत्त आश्रमाचे शिवानंद स्वामी महाराज, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शंकर जगताप, सुभाष दादा काटे, जयश्रीताई जगताप, मीनाताई काटे, विजू अण्णा जगताप, प्रकाश भाऊ काटे, उद्योजक विजय शेठ जगताप, ह भ प बभृहन महाराज वाघ, बाळासाहेब करंजुले, अरुण अण्णा काटे, रमेश काशिद, उद्धव कवडे , सखाराम रेडेकर सुनील कोकाटे आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभाजप महिला आघाडीच्या वतीने सोनापूर- कॉम्प्लेक्स वार्डात घर- घर चलो महा जनसंपर्क अभियान
Next articleखालेद रसुलमियाँ बागवान यांची शास्त्रज्ञ डि आर डी ओ पदी निवड झाल्याने सावरगाव येथे सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here