Home नांदेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा या पुस्तकाचे प्रकाशन..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा या पुस्तकाचे प्रकाशन..!

104
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0049.jpg

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा या पुस्तकाचे प्रकाशन..!

येरगी पहिली ग्रा.पं. ठरली भारतातील कॉफी टेबल बुक प्रकाशित करणारी.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज
बिरादार

देगलूर
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात असलेल्या होट्टल पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील येरगी नावाचे चालुक्यकालीन ऐतिहासिक गावात असलेल्या शिल्प अवशेषांच्या संदर्भाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून व माजी आमदार सुभाष साबने यांच्या पुढाकाराने कॉफी टेबल बुक तयार करण्यात आले. या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दि.२५ जून २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सावंत, अब्दुल सत्तार, खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे,भाजपा जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कॉफी टेबल बुकचे लेखन मुर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. अरविंद सोनटक्के, पुरातत्त्व अभ्यासक डॉ. कामाजी डक व इतिहास अभ्यासक सुरेशे जोंधळे, यांनी केले आहे.
मार्गदर्शक इतिहास तज्ञ प्रभाकर देव यांनी प्रस्तावना लिहिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यरत नायब तहसिलदार मकरंद दिवाकर यांच्या फोटो व कला शिक्षक गजानन सुरकुटवार यांनी पुस्तकाची सुबक डिजीटल मांडणी केली. या सर्व कामात वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील व ग्रामविकास अधिकार राजेश तोटावार यांचे सहकार्य लाभले. दि.12 मार्च 2023 रोजी सुरु झालेल्या या कामाचे मुर्तरुप येरगी चालूक्यकालीन सांस्कृतिक झरा या रुपाने तयार झाले.
मुख्यमंत्री यांनी पुस्तक प्रकाशन समयी येरगी ग्रामपंचायतीच्या कार्याची प्रशंसा करीत, कॉफी टेबल बुक निर्मितीच्या कार्यास पाठीवर थाप देत, संतोष पाटील व सरपंच श्रीमती संगीता मठवाले पाटील यांचे या कामी योगदानाबद्दल कौतुक केले.
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री गिरिश महाजन व जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत येरगी गावातील चालुक्य कालीन केशव मंदीराच्या गर्भगृहाच्या व्दारशाखेची प्रतिकृती समावेश असलेले शासन आपल्या दारी नांदेड जिल्हा प्रशासनाचे स्मृती चिन्हाने केले.
उत्तर चालुक्यांच्या राजवटीत नांदेड जिल्ह्यात असंख्य कलाकृती असलेली मंदिरे निर्माण झाली. असेच काही कलात्मक अवशेष येरगी येथे आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय मानले जाणारे शिलालेख, उमा महेश्वर, लक्ष्मीनारायण, सरस्वती, ब्रम्हा, गणेश, चामर धारीनी आणि योद्धांचे शिल्प यासोबत गावात असलेली विविध आड, दोन बारव या सर्वांची बरीच पडझड झाली होती.
येरगी येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील आणि तरुणांनी पुढाकार घेऊन हे सर्व कलाविष्कार जोपासण्याचे कार्य हाती घेतले आहे. या कलाकृतीचे जतन आणि संवर्धन करून पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आणि त्यातूनच ‘येरगी – चालूक्य कालीन सांस्कृतिक झरा’ हे पर्यटकांना आकर्षित करणारे छोटेसे सचित्र पुस्तक निर्माण झाले आहे.
येरगी ग्रामपंचायत कडून गावातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कॉफी टेबल बुक चे प्रकाशन करण्यात आल्याने संतोष पाटील व सर्व सदस्य यांचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here