Home जळगाव भुसावळला ट्रक व दुचाकींचा अपघात; एक ठार एक जखमी ! स्थानिक लोक...

भुसावळला ट्रक व दुचाकींचा अपघात; एक ठार एक जखमी ! स्थानिक लोक प्रतिनिधी यांचे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0071.jpg

भुसावळला ट्रक व दुचाकींचा अपघात; एक ठार एक जखमी ! स्थानिक लोक प्रतिनिधी यांचे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन
भुसावळला ट्रक व दुचाकीचा अपघात; एक ठार एक जखमी !
जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.
भुसावळ शहरातील श्रीराम नगर, बालाजी लॉन समोरी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक प्रमोद वना झोपे ( वय ५८) हे जागीच ठार झाले असून त्यांचा मुलगा धिरज प्रमोद झोपे (वय ३२) हा जखमी झाला असून भुसावळ रिदम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालक घटनास्थळा वरून पसार झाला आहे. घटनास्थळी श्रीराम नगर परिसरातील सातशे ते आठशे नागरीकांनी जमाव केला आहे.

रस्त्यावरच लोकप्रतिनिधी यांचे ठिय्या आंदोलन!
रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बनविण्यात आले आहे. सिंधी कॉलनी, श्रीराम नगर, वांजोळा रोड असे अनेक भागातील रहिवाशी लग्न कार्य तसेच काही व्यवसायिक याच दुभाजकां ठिकाणाहून रस्ता ओलांडत आपला प्रवास करतात. खरे तर हायवे वर दुभाजक तोडून प्रवास करणे जीव मुठीत धरल्यासारखे आहे.पण हायवे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे आज एका निष्पाप व्यक्तीला जीव गमावण्याची वेळ आली आहे. असे जेही दुभाजक तोडून प्रवास होत असेल तर ते त्वरित बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रात्री ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याने परिसरातील नागरीक आक्रमक झाली असून सातशे ते आठशे जणांचा जमाव रस्तावर होऊन भुसावल विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे अपघाताच्या ठिकाणी स्वतः दाखल झाले असून माजी नगरसेवक निर्मल कोठारी, महेंद्रसिंग ठाकूर, किरण कोलते यांच्यासह रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू आहे. रस्त्यांच्या दोघे बाजुंनी दीड ते दोन किलोमीटर वाहन थांबून आहे. घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहचले आहे.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा या पुस्तकाचे प्रकाशन..!
Next articleशंकरराव आगळे यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here