• Home
  • सातारा जिल्ह्यात आणखी ६ बळी!

सातारा जिल्ह्यात आणखी ६ बळी!

⭕ सातारा जिल्ह्यात आणखी ६ बळी! ⭕
सातारा 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोरोना बाधितांनी द्विशतक ओलांडलेल्या सातारा जिल्ह्यासाठी शुक्रवार बळीवार ठरला. जावली तालुक्यातील वरोशीतील कोरोना बाधिताचा मृत्यू झाला तर उंब्रज येथील दोन महिन्याच्या बाळाचा, नांदलापूर, कराड येथील महिलेचा व पाचगणी येथील मुंबई रिटर्न महिला या तीन संशयितांचाही शुक्रवारी मृत्यू झाला. एवढेच नाही तर जावलीतील तालुक्यातील मुंबईस्थित दोन युवकांचाही मृत्यू झाला. ओझरे व बेलोशी येथील या युवकांचा मृत्यू झाल्याने जावली हादरली आहे. कोरोना बाधितांची संख्या २०१ असताना शुक्रवारी आणखी २६८ कोरोना संशयित दाखल झाल्याने सातारा जिल्ह्यात घबराट उडाली आहे.

जिल्ह्यात 4 दिवसांपासून बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.
मंगळवारी २८ बुधवारी १५ तर शुक्रवारी २० असे तीन दिवसांत तब्बल ६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मुंबई, पुणेसह इतर ठिकाणांहून येणारे प्रवाशी पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारी जावली तालुक्यातील वरोशी येथील ५८ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. येथे शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. याचवेळी वरळी (मुंबई) येथून आलेल्या पाचगणी येथे होम क्वारंटाईन असलेल्या ६४ वर्षीय महिलेचा दमा व ह्रदयविकाराने मृत्यू झाला आहे. घाटकोपर (मुंबई) येथून आलेल्या २ महिन्यांच्या चिमुरड्याचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृष्णा मेडिकल कॉलेज येथे मृत्यू झाला. तर नांदलापूर (ता.कराड) येथील ६० वर्षीय महिला संशियत म्हणून दाखल असताना तिचाही मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या तिघांच्याही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच नेमके कारण समोर येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने खेड (ता. सातारा), बनपुरी (ता. पाटण), म्हारूगडेवाडी (ता. कराड), कोळकी (ता. फलटण) व वरोशी (ता. जावली) येथील पाचजणांना गिळंकृत केले आहे. त्याचबरोबर जावली तालुक्यातील ओझरे व बेलोशी या गावांमधील दोन युवकांचाही मुंबईत मृत्यू झाल्याने ही गावेही हादरून गेली.

anews Banner

Leave A Comment