• Home
  • धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आज दिवसभरात 9 रुग्णांची भर, यात एका 6 वर्षीय चिमुकलीलाही कोरोनाची बाधा*

धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आज दिवसभरात 9 रुग्णांची भर, यात एका 6 वर्षीय चिमुकलीलाही कोरोनाची बाधा*

*धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आज दिवसभरात 9 रुग्णांची भर, यात एका 6 वर्षीय चिमुकलीलाही कोरोनाची बाधा*
*नांदेड दि २३ ; राजेश एन भांगे*
जिल्ह्यातील शनिवारी दि 23 मे 2020 रोजी सांयकाळी प्राप्त झालेल्या एकूण 135 अहवालानुसार 120 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.त्या पैकी 6 अहवाल पॉसिटीव्ह व सकाळी 3 रुग्णांचे स्वाब पॉसिटीव्ह आल्यामुळे नांदेड ची एकून पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 125 झाली आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव रुग्णांपैकी करबला भागातील दोन रुग्ण (एक पुरुष वय वर्ष 38 – एक मुलगी वय वर्ष – 6)
व कुंभार टेकडी येथील 2 रुग्ण (एक पुरुष वय वर्षे 15 व एक स्त्री वय वर्ष 28) आणि उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 2 रुग्ण (एक पुरुष वय वर्ष 24 व एक स्त्री वय वर्ष 22) असे तीन पुरुष, एक 6 वर्षी मुलगी, व दोन स्त्रिया असे एकूण 6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळे असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
व तसेच ग्रामीण रुग्णालय बारडच्या कोविड सेंटर येथील 1 रुग्ण डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2 रुग्ण. आज दिवसभरात असे 3 रुग्ण बरे झाल्यामुळे, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे,
आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यातून 125 रुग्णांपैकी 55 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे व उर्वरित 62 रुग्णावर औषध उपचार चालू आहेत.

एकूण 125 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, 55 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, उर्वरित 62 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड पंजाब भवन कोवीड सेंटर,, यात्री निवास कवडी सेंटर येथे 49 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 9 पॉझिटिव रुग्णांची भर
☑️यात करबला भागातील एका 6 वर्षी मुलीचा समावेश.
☑️ एकूण रुग्ण संख्या 125वर.
☑️ 55 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️62 रुग्णांवर उपचार सुरू.
#Playmarathinews
दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment