• Home
  • पुण्यातील रस्ते खुले; मुख्य रस्त्यांवर वाहतूक सुरू

पुण्यातील रस्ते खुले; मुख्य रस्त्यांवर वाहतूक सुरू

⭕पुण्यातील रस्ते खुले; मुख्य रस्त्यांवर वाहतूक सुरू
पुणे :(विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच, अनेक व्यापारी हे नाराज असून, त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते सुरू करण्यात?आले असून, पोलिसांचा बंदोबस्तदेखील हटवण्यात आला आहे. तसेच, नदीवरील बंद करण्यात आलेले पूलदेखील सुरू करण्यात आले आहे.शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आल्यानंतर शुक्रवारी शहरातील ९० टक्के रस्ते खुले करण्यात आले. सर्व रस्त्यांवर लावण्यात आलेले बांबू आणि बॅरिकेटस् हटवण्यात आले आहेत. तसेच, वाहतुक नियंत्रणासाठी पोलिस आता रस्त्यांवर थांबणार नाहीत. त्यामुळे शहरात शुक्रवारी शहरातील रस्त्यांवर कोठेही पोलिस बंदोबस्त दिसला नाही.लॉकडाऊनमुळे शिथिलता दिल्यानंतर शहरातील अनेक दुकाने हळूहळू सुरू करण्यात?आली आहेत. त्यामुळे मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्त्यावरील अभिनव चौकातील बॅरीकेटस् नागरीकांनी काढली. तसेच, लोकमान्य टिळक चौकातील बॅरिकेटस् काढून पोलिसांनी संभाजी पूलावरील वाहतुकदेखील खुली केली. मात्र, बाजीराव रस्त्याच्या पूर्वेकडील भागाकडे जाणारे सर्व रस्ते बंदच ठेवण्यात?आले होते. अप्पा बळवंत चौक, मंडई आणि शुक्रवार पेठेकडील जाणारे सर्व रस्ते बांबू आणि बॅरिकेटस् लावून बंदच ठेवले होते.परवानगी देण्यात आलेल्या दुकानदारांपैकी कपडे, भेळ, मिठाई, सराफ आदींची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सोयीनुसार सुरू होती.
*चौकाचौकात सिग्नल सुरू*
लॉकडाऊनच्या काळात घरात बसलेल्या नागरीकांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे, नागरीक मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन रस्त्यावर उतरले होते. गर्दीमुळे शहरात वाहतुककोंडी किंवा इतर वाहतुकीचे प्रश्न निर्माण होऊ नयेत. यासाठी अनेक ठिकाणी चौकाचौकात सिग्नल सुरू करण्यात आले होते. तसेच, वाहतुक नियंत्रणासाठी रस्त्यावर असणार्‍या पोलिसांचे प्रमाणदेखील फार कमी होते.

anews Banner

Leave A Comment