• Home
  • बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची मागणी

बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची मागणी

मालेगांव,(सुनील मिस्तरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
मालेगांव-महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे तसेच संपुर्ण देशभरात लॉकडाऊन चा चौधा टप्पा सुरू आहे . लोकडाऊन च्या या काळात बांधकाम व्यावसायिकांना परवानगी नाकारल्या मुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे.सदर बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात मजुरवर्ग अवलबून आहे या लॉकडाऊन मुळे बांधकाम मजूर तसेच बिगारी कामगार यांचा दैनदिन रोजगार ठप्प झालेला असून त्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार सुरू आहे.मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम मजुरवर्ग सध्या घरी असून त्यांचासमोर रोजच्या आहाराचा देखील प्रश्न उभा राहिला आहे . कामगार कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या निर्णयानुसार नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या बैंक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान येणे अपेक्षित असले तरीही मालेगाव शहरात या निर्णयाची अमलबजावणी होत नाही . या निवेदनाद्वारे आम्ही आपणांस विनंती करू इच्छितो की सदर बांधकाम मजुरांची परवड लक्षात घेता लवकरात लवकर नोंदणीकृत मजुरांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी.अशा आशेयाचे निवेदन
मुख्यमंत्र्यांना
सार्वजनिक एकता मंच संस्थापक अधयक्ष मोहन पुंडलिक कांबळे,लोकेश चव्हाण,अविनाश परमार,अमोल पोळ,प्रमोद चौधरी आदिनी एका पत्राद्वारे निवेदन दिले आहे.

anews Banner

Leave A Comment