आशाताई बच्छाव
देवरूख येथे नाभिक संघातर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न रत्नागिरी,(सुनिल धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघातर्फे प्रतिवर्षी साजरी केली जाते. संघाचे अध्यक्ष श्री. वैभव रविंद्र भोसले, उपाध्यक्ष मनोज चव्हाण व कमिटीचे पदाधिकारी तसेच बंधु भगिनी आदी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. स्थानिक चव्हाणआळी येथील बंधु भगिनींनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
सकाळी ८:३० वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पूजा व आरती करून तीर्थप्रसाद देण्यात आला. कुचांबे येथील प्रवचनकार श्री तुकाराम बुवा काजवे यांचे श्री संतसेना श्री व मांदिया श्री यांच्या जीवन चरित्रेवर आधारित प्रवचन झाले. त्यानंतर संघाचे प्रकाश पवार यांनी संघटनात्मक चर्चा करून योग्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा प्रसंगी प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये काजवे बुवांचा सत्कार जेष्ठ श्री नारायण यादव यांनी केला. देवरूख नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ. मृणालताई शेट्ये यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ महिला सौ. वर्षा प्रकाश पवार यांनी केला. तसेच आंगवली येथील निवृती (माध्यमिक) शिक्षक श्री राजेंद्र कदम यांच्या सौभाग्यवती यांचा ही शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री रामनाथ चव्हाण यांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यासोबत संघाचे अध्यक्ष वैभव भोसले यांचा सत्कार माजी अध्यक्ष परशुराम चव्हाण यांनी केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिनेश अंब्रे यांनी मानले.
यावेळी ज्येष्ठ महादेव चव्हाण , जेष्ठ कार्यकर्ते अभिजित चव्हाण, माजी उपाध्यक्ष सदानंद चव्हाण, अनंत भोसले, राजेंद्र माने, गोपीनाथ यादव, आदी उपस्थित होते.






