Home नाशिक वनसगाव ग्रा पं च्या उपसरपंचपदी वनिताताई शिंदे निवडीचे वृत्त कळताच समर्थकांनी केला...

वनसगाव ग्रा पं च्या उपसरपंचपदी वनिताताई शिंदे निवडीचे वृत्त कळताच समर्थकांनी केला आनंदाने जल्लोष

81
0

आशाताई बच्छाव

20230602_074350-BlendCollage.jpg

वनसगाव ग्रा पं च्या उपसरपंचपदी वनिताताई शिंदे

निवडीचे वृत्त कळताच समर्थकांनी केला आनंदाने जल्लोष

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

वनसगाव तालुका निफाड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोटेशन पद्धतीनुसार उपसरपंच पदासाठी वनिता संतोष शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती अध्यासी निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच महेश गणपत केदारे व ग्राम विकास अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी जनार्दन कचरू वाघ यांनी दिली आहे.
वनसगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा रोटेशन पद्धतीने नुसार मावळते उपसरपंच आशा दीपक घाडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच या रिक्त जागेवर निवड करण्यात आली आहे. अध्यासी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच महेश केदारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा पं कार्यालयात सहविचार सभा घेण्यात आली.या बैठकीला मावळते उपसरपंच आशा दिपक घाडगे,ग्रा पं सदस्य भगवान बारकु घाडगे, उत्तम देवराम शिंदे, संगीता प्रकाश कडाळे, मीना राधु शिंदे, कल्पना विक्रम कापडी,सरला एकनाथ शिंदे, राहुल शिवाजी डुंबरे,केशव त्र्यंबक शिंदे, ग्रामविकास अधिकारी जे के वाघ, रामकृष्ण वाघ, साधना निकम,मदन गोयल,रवि शिंदे आदी उपस्थित होते.
उपसरपंच पदासाठी वनिता संतोष शिंदे यांनी अर्ज दाखल केला.निर्धारीत वेळेत वनिता‌ संतोष शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती अध्यासी निवडणूक अधिकारी सरपंच महेश केदारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्राम विकास अधिकारी जनार्दन कचरू वाघ यांनी जाहीर केले.
उपसरपंच पदासाठी वनिता संतोष शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सर्व ग्रा पं सदस्य, समर्थक, हितचिंतक, ग्रामस्थ आदींनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शासनाच्या वतीने देण्यात येणारा अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार आशा स्वयंसेविका प्रांजल संदीप निरभवणे व सौ रत्ना संजय शिंगाडे यांना जाहीर झाला असून उपसरपंच निवड कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पाचशे रुपये देऊन ग्रामपंचायत सदस्य संगीता कडाळे व मीना राधु शिंदे त्यांच्या हस्ते करण्यात आला.
या निवडीप्रसंगी सोमनाथ महाले,केशव बुंदे, भाऊसाहेब आहेर, अजित नवले ,संजय कमानदार, राजेंद्र निकम, बाळासाहेब शिंदे, कैलास भालेराव, उमेश डुंबरे, सुभाष जाधव, प्रल्हाद डुंबरे,अनिल उल्लारे, डॉ योगेश डुंबरे, बापुसाहेब शिंदे, अशोकराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, संतोष (आण्णा) शिंदे, प्रकाश शिंदे, गणपत बंडु शिंदे, बाजीराव शिंदे, शिवाजी रामभाऊ शिंदे, भाऊसाहेब शिंदे, धनंजय डुंबरे, उत्तम जाधव, महेंद्र शिंदे,राधु शिंदे, सुभाष चौधरी,मधुकर निवृत्ती शिंदे, लक्ष्मण शिंदे, रघुनाथ शिंदे, एकनाथ मामा शिंदे, शिवाजी कापडी, दिपक कापडी, सुरेश शिंदे,किरण शिंदे,सागर शिंदे, मारुती जाधव, आबासाहेब कापडी, उत्तम शिंदे,आण्णा शिंदे गणेश जाधव, विठ्ठल शिंदे,राहुल शिंदे, नारायण शिंदे, गणेश शिंदे, पंकज शिंदे, विक्रम कापडी, राजेंद्र निकम,दिपक घाडगे, प्रसाद शिंदे, आदित्य आवारे,भावेश खापरे, राहुल यशवंत शिंदे, पंकज शिंदे, सुनील अस्वले,अमित शिंदे, जनाबाई भालेराव, मंगल उत्तम शिंदे,पद्मा पगारे, मंगला विलास शिंदे, लिलाबाई शिंदे, निर्मला शिंदे, अनिता शिंदे, मीना शिंदे, सुनिता जाधव,रत्ना शिंगाडे.अमोल पगारे,ऋषी शिंदे,राकेश शिंदे, सुनील मापारी, संतोष अस्वले,महेंद्र सस्कर, धोंडीराम वाघ, प्रांजल निरभवणे,रत्ना शिंगाडे आदी उपस्थित होते.

ग्राम विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर लक्ष केंद्रित करणार–

आज उपसरपंच पदासाठी माझ्या नावाची सूचना आणून बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याचबरोबर शासनाच्या विविध शासकीय योजना ज्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत असतात त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे. नागरिकांसाठी मुबलक पाणी, शिक्षण, आरोग्य आदी महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपण लक्षण केंद्रित करणार आहोत.

सौ वनिता संतोष शिंदे नवनियुक्त उपसरपंच वनसगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here