Home अमरावती महावितरण मोर्शी ग्रामीण भागातील सहाय्यक अभियंताला १५ हजार रुपयाची लाच घेताना प्रतिबंधक...

महावितरण मोर्शी ग्रामीण भागातील सहाय्यक अभियंताला १५ हजार रुपयाची लाच घेताना प्रतिबंधक विभागाने केली कारवाई. अभियंता अटक.

81
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230615-130913_WhatsApp.jpg

महावितरण मोर्शी ग्रामीण भागातील सहाय्यक अभियंताला १५ हजार रुपयाची लाच घेताना प्रतिबंधक विभागाने केली कारवाई. अभियंता अटक.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा

पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
घरगुती वीज मीटरचे व्यावसायिक मध्ये रूपांतर करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाज घेताना महावितरणच्या अमरावती जिल्हा मोर्शी ग्रामीण भागात सहाय्यक अभियंत्याला अटक करण्यात आली. 14 जून रोजी लातूर प्रतिबंधक विभागाने मोर्शी येथे ही कारवाई करण्यात आली.
घरगुती वीज मीटरचे व्यावसायिक मध्ये रूपांतर करण्यासाठी मोर्शी येथील प्रभात चौकातील रहिवासी असलेले ६३ वर्षीय व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती त्यानुसार, सहाय्यक अभियंता अंकुश सूर्यभान ठाकरे यांनी तक्रारदाराच्या मालकीचे घरगुती वापराचे वीज मीटर हे व्यावसायिक वापराकरता रूपांतरित करून देण्यासाठी २० हजार रुपये लाचीची मागणी केली. त्यावरून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी १५ हजार रुपये घेण्याची त्याने तयारी दरशीविली. अंकुश ठाकरे यांनी त्यांच्या कक्षात बाकीची रक्कम तक्रारदाराकडून घेतात लाख रुचवत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. लाखेच्या रकमेसह त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध मोर्शी जिल्हा अमरावती, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल कडू योगेश कुमार धंदेबल अशीच जांभळे सतीश यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here