Home महाराष्ट्र ग्रामपंचायत उमेदवारांना ही अट आली आडवी अनेकांचा पत्ता झाला कट तर बाकीचे...

ग्रामपंचायत उमेदवारांना ही अट आली आडवी अनेकांचा पत्ता झाला कट तर बाकीचे अर्ज भरताना होते अक्षरशा दमछाक..

100
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत उमेदवारांना ही अट आली आडवी अनेकांचा पत्ता झाला कट तर बाकीचे अर्ज भरताना होते अक्षरशा दमछाक..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असेल तरीही ग्रामपंचायती रिंगणात इच्छुक उमेदवारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सातवी पास ची टाकण्यात आलेली अट उमेदवारी अर्ज भरण्यात सलग तीन दिवस सुट्टी व ऑनलाईन अर्ज भरताना काही ठिकाणी येत असलेल्या तांत्रिक अडचणी यामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नव्या जीआर मुळे इच्छुकांचा हिरमोड झाला असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने जीआर जारी केल्याने ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या अनेकांच्या इच्छा वर पाणी फिरले आहे जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल आणि त्याला सरपंच म्हणून नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे 24 डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गावात वट असुनही केवळ शिक्षण नसल्याने अनेकांना निवडणूक लढवता येणार नाही परिणामी आपल्या शिकलेल्या नातलगांना सेटिंग सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इच्छुकांना 23 ते 30 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज भरण्यास सांगितले आहे निवडणूक आयोगाने इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी एकूण आठ दिवस दिले आहेत. मात्र यातील तीन दिवस तर सुट्ट्या मध्येच जात असल्याने केवळ पाच दिवस हातात उरत असल्याने इच्छुकांची धावपळ होत आहे. आज नाताळ असल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे उद्या 26 डिसेंबर रोजी महिन्याचा शेवटचा शनिवार असल्याने सुट्टी आहे त्यामुळे आता इच्छुकांना थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी वेळ असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करणे अनामत रकमेची जमवाजमव करणे झेरॉक्स करणे आदी गोष्टीसाठी इच्छुकांना तारेवरची कसरत करत असतानाचे चित्र दिसून येत आहे.

Previous articleमोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका शिबिर कार्यालयाचा पुढील प्रमाणे दौरा ..
Next articleबागलाण तालुक्यातील तताणी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here