Home मुंबई बेळगाव येथील मराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान, गृहमंत्री गप्प का ? ;...

बेळगाव येथील मराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान, गृहमंत्री गप्प का ? ; खासदार संजय राऊत

108
0

राजेंद्र पाटील राऊत

बेळगाव येथील मराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान, गृहमंत्री गप्प का ? ; खासदार संजय राऊत

राजेश एन भांगे / युवा मराठा न्युज नेटवर्क

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा एकदा चिघळणार असल्याचं दिसत आहे.
कारण, बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे.

एवढंच नाहीतर गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, गाडीवरील भगव्या फलकास काळे फासण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.
यास शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले असुन, कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली आहे.
सध्या सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, भा.ज.पा. व पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, “ज्या प्रकारे बेळगावमध्ये कर्नाटक भा.ज.पा.प्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ले करत आहेत.
आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत.

हे अत्यंत चिंताजनक आहे.
भा.ज.पा.ला किंवा केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार सुरू आहे, असं ते म्हणत आहेत,
त्याबद्दल त्यांना खूप चिंता आहे.
मात्र बेळगावमध्ये आठ दिवसांपासून आमच्या लोकांवर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहेत,
खुनी खेळ सुरू आहे.

त्याबाबत भा.ज.पा.चा कोणताही वरिष्ठ नेता, केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधान काहीच बोलत नाही?”

तसेच, “तिथं आमच्या लोकांची डोकी फुटत असतील, तर आम्ही देखील हातात दंडुके घेऊन तिथं जावं का?
आम्ही देखील तशाचप्रकारे उत्तर देऊ शकतो.

Previous article१३ मार्च २०२० रोजी ठाण्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला
Next articleसावरमाळ प्रा.आ.केंद्रात बबनराव पा.गोजेगावकर यांच्या शुभहस्ते कोव्हिड लसिकरणाचे उदघाटन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here