• Home
  • सावरमाळ प्रा.आ.केंद्रात बबनराव पा.गोजेगावकर यांच्या शुभहस्ते कोव्हिड लसिकरणाचे उदघाटन..

सावरमाळ प्रा.आ.केंद्रात बबनराव पा.गोजेगावकर यांच्या शुभहस्ते कोव्हिड लसिकरणाचे उदघाटन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210313-WA0102.jpg

सावरमाळ प्रा.आ.केंद्रात बबनराव पा.गोजेगावकर यांच्या शुभहस्ते कोव्हिड लसिकरणाचे उदघाटन..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक ८ रोजी सकाळी ११ वाजता कोविड लसीकरणाचे उद्घाटन युवा नेतृत्व,जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी मा.बबनराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश रावीकर,डॉ.संदेश राठोड,दिगंबर पाटील गोजेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ही लस ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील मधुमेह रक्तदाब असणाऱ्या गंभीर रुग्णांसाठी तसेच ६० वर्षावरील सर्व वयोवृद्ध नागरिकांसाठी उपलब्ध असून सावरमाळ येथे दर सोमवार, बुधवार व शुक्रवारी लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.रावीकर यांनी दिली सावरमाळ येथे कोविड लसीकरण उपलब्ध करून दिल्याने मुक्रमाबादसह परिसरातील नागरिकांचे मुखेड येथे जाऊन लस घेण्याची फरफट थांबणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत होत आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लस देण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक रामराव पल्लेवाड,सरपंच प्रतिनिधी गंगाधर आप्पाने,उपसरपंच वीरेश आनमवार, विजय स्वामी, राजू खुणेवाड, रामराव कूडदुले, तानाजी लोंगने,आरोग्य कर्मचारी नागनाथ दमकोंडवार, किरसंबरे, एस.व्ही.काळे यांच्यासह सावरमाळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सावरमाळ व मुक्रामाबाद परिसरातील ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी शासनाकडून देशात थैमान घालणार कोरोना महामारीची लस उपलब्ध करून देण्यातआहे.परिसरातील नागरिकांनी लस घेऊन कोव्हिड १९ या आजाराच्या संक्रमणापासुन सुरक्षित राहावे आणी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.कोरोना लस हि पु्र्णपणे सुरक्षीत आहे.या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत यामुळे हि लस सर्वांनी घ्यावी.

मा.बबनराव पाटील गोजेगावकर जि.प.सदस्य प्रतिनिधी

anews Banner

Leave A Comment