• Home
  • विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – व्यंकटराव पा.गोजेगावकर

विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – व्यंकटराव पा.गोजेगावकर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210313-WA0091.jpg

विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – व्यंकटराव पा.गोजेगावकर..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील येथील राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान जिल्हा परिषद नांदेड च्या वतीने आमचा गाव आमचा विकास आराखडा अंतर्गत गावाच्या विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही,असे जेष्ठ नेते नांदेड भाजपाचे जिल्हाध्यक्ष,जि.प.मधील गटनेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी जाहीर केले.
बुधवार दि.१० रोजी गोजेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गणस्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर होते तर प्रमुख पाहुणे मुखेडच प.स चे गट विकास अधिकारी तुकाराम भालके,जि.प.सदस्य प्रतिनिधी युवा नेतृत्व बबनराव पाटील गोजेगावकर,देवकते, बालाजी पाटील,उपसरपंच दिगंबर पाटील, रावणकुळाचे सरपंच प्रकाश कोडगिरे,नारायण पाटील,भंडारे,बालाजी पसरले,सदाशिव बोयवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
गोजेगावकर यांनी पुढे बोलताना म्हणाले की,१५ वा वीत आयोगातून गावाचा विकास करण्यासाठी गावातील मुलभूत गरजांना प्राधान्य देऊन योजना राबवित असताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषात बसून प्राधान्याने काम करावे. आमचा गाव आमचा विकास अंतर्गत कामे करत असताना निधीची काळजी करू नका.गोजेगाव सह मुक्रमाबाद परिसरातील गावांना निधीची कमतरता पडू देणार नाही आणी प्रत्येक गावातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचानी गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून सदर योजना राबवावी असे नमुद केले यावेळी दत्ता पाटील गोजेगावकर, गजानन पाटील,श्रीनिवास पाटील, ग्राम विकास अधिकारी बी.टी बिरादार,एच.एम. वाघदरे,जाकीर हुसेन,शुभम भुगे, घोळेकर,शिवराज पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक,अंगणवाडीसेविका व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment