Home कोल्हापूर शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवल्याने शिवसैनिकासह सर्वसामान्यही झाले सोशल मीडियावर भावुक.

शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवल्याने शिवसैनिकासह सर्वसामान्यही झाले सोशल मीडियावर भावुक.

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20221009-WA0039.jpg

शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवल्याने शिवसैनिकासह सर्वसामान्यही झाले सोशल मीडियावर भावुक.

पेठवडगांव राहूल शिंदे:केंद्रीय निवडणूक आयोगान शिवसेनेच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.यामधून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष वाढला असल्याचे दिसत आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली कंबर कसली आहे.उद्धव ठाकरे यांनी इन्स्ट्राग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.ज्यात ते शिवेसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे.या फोटोला जिकूंन दाखवणारच अस कॅप्शन दिलंय.
दरम्यान शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगान गोठवलं असलं तरी,उद्धव ठाकरे यांनी आपली शस्त्र खाली टाकली नसल्याचं या पोस्ट ने स्पष्ट होतंय.या पोस्ट नंतर शिवसैनिक ही भावुक झाले आहेत.अनेक शिवसैनिकांनी साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी कमेंट करत उद्धव ठाकरेना पाठिंबा दर्शवला आहे.याशिवाय सर्वसामान्य जनतेमधून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठ्याप्रमाणात भावनिक पोस्ट व्हायरल झालेले आहेत.त्यामधून भाजपवर निशाणा साधल्याचे दिसून येते.दरम्यान इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही पोस्टसह व्हायरल होताना दिसून येत आहे.

Previous articleयेवती येथील पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.
Next articleयेवती येथील पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here