Home मराठवाडा पंजाबमधील हार्वेस्टरचालकांसाठी ‘सुगी’ महाराष्ट्रातील गहू काढणीमुळे  🛑

पंजाबमधील हार्वेस्टरचालकांसाठी ‘सुगी’ महाराष्ट्रातील गहू काढणीमुळे  🛑

100
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पंजाबमधील हार्वेस्टरचालकांसाठी ‘सुगी’ महाराष्ट्रातील गहू काढणीमुळे  🛑
✍️ औरंगाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕दिवसभरात एक हार्वेस्टरचालक साधारण ४० ते ५० एकरवरील गहू काढणी करतो.
महाराष्ट्रातील गहू काढणीचा काळ सुगीचे दिवस ठरणारे असल्याचे ओळखून पंजाब व हरियाणातील हार्वेस्टरचालक सध्या येथे दाखल झालेले आहेत. औरंगाबादजवळील झाल्टा फाट्यावर आठ ते दहा हार्वेस्टरचालक आलेले असून विभागातील तीन जिल्ह््यांमधील सव्वा दोन लाखांपेक्षा अधिकच्या एकर क्षेत्रावर उभा गहू एक ते दीड महिन्याच्या कालावधीतील काढणीतून ३ ते ४ कोटी रुपयांचे काम हातावेगळे करून महिनाभरात ते परततील.

ग्रामीण भागातून शहरांमध्ये झालेले मजुरांचे स्थलांतर, त्यामुळे गावपातळीवर भासत असलेला मजुरांचा तुटवडा, शेतीतील कामे मजुरांच्या भरवशावर नव्हे तर यांत्रिकीकरणातूनच उरकण्याचा आलेला काळ  पाहता महाराष्ट्रातील शेतक ऱ्यांना गहू काढणी ही हार्वेस्टरशिवाय केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे ओळखून पंजाब-हरियाणातील हार्वेस्टरचालक सध्या मराठवाड्यात दाखल झालेले आहेत. औरंगाबाद शहराजवळील झाल्टा फाट्यावर आठ ते दहा हार्वेस्टरचालकांचा मुक्काम असून सकाळी सातपासून सुरू झालेले त्यांचे काम सायंकाळी अंधार पडेपर्यंत परिसरातील शिवारांमध्ये चालते. दिवसभरात एक हार्वेस्टरचालक साधारण ४० ते ५० एकरवरील गहू काढणी करतो. एक लिटर डिझेलमध्ये एक एकरपर्यंच्या गव्हाची काढणी होते. एकरी २ हजार रुपये काढणीसाठी आकारले जात असून यंदा डिझेलचा दर वाढल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत एकरी ३०० ते ५०० रुपये अधिकचे घेतले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
रब्बी हंगामात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह््यांत गव्हाच्या ९४ हजार ३२४.२० हेक्टरपैकी ९२ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. एकरात हे क्षेत्र साधारण २ लाख ३५ हजारपर्यंत आहे. एवढ्या एकरवर पेरणी झालेला गहू आता काढणीला आलेला आहे. गव्हाची काढणी आता हार्वेस्टरद्वारेच केली जाते. मजुरांची वाढलेली मजुरी, त्यांचा तुटवडा आणि त्यासाठी लागणारा वेळ आदी कारणे आहेत.

*खरेदीत सवलत नाही*

आपल्या भागातील शेतक ऱ्यांना हार्वेस्टर खरेदीसाठी बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. मुख्य म्हणजे हार्वेस्टर खरेदीसाठी सवलत (सबसिडी) मिळत नाही.

हरयाणा-पंजाबातील शेतक ऱ्यांना २५ लाखांच्या हार्वेस्टरमागे ५ लाखांची सवलत मिळते. हार्वेस्टर खरेदीसाठी आपल्याकडे १२ टक्के वार्षिक व्याजदर अर्थपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्या आकारतात. मागील तीन महिन्यात मराठवाडा, जळगाव, धुळे, अहमदनगर या जिल्ह््यांमध्ये ५० हार्वेस्टरची आपण विक्री केली. – नारायण डिघुळे, वितरक.

चालकही पंजाबातून आणावा लागला औरंगाबाद जिल्ह््यात मोजक्याच शेतकऱ्यांकडे हार्वेस्टर आहे. त्यापैकी आडगावातील किशोर नागरे हे एक आहेत. पण त्यांच्याकडील हार्वेस्टरचालक हा पंजाबी आहे. त्याला महिना ५० हजार रुपये द्यावा लागत असल्याचे नागरे यांनी सांगितले.⭕

Previous articleविकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – व्यंकटराव पा.गोजेगावकर
Next articleपवार ऍक्शन मोडवर : मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट नांगरे पाटलांना बोलावले, अर्धा तास चर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here