• Home
  • 🛑 गणेश चतुर्थी : ‘या’ शुभ मुहूर्तावर करा गणपतीची प्राणप्रतिष्ठा व पूजा 🛑

🛑 गणेश चतुर्थी : ‘या’ शुभ मुहूर्तावर करा गणपतीची प्राणप्रतिष्ठा व पूजा 🛑

🛑 गणेश चतुर्थी : ‘या’ शुभ मुहूर्तावर करा गणपतीची प्राणप्रतिष्ठा व पूजा 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 22 ऑगस्ट : ⭕ भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण देशभरात गणेश पूजा केली जाईल. गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते. गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेलेआहे. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे. गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थी अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते, असे सांगितले जाते.

सन २०२० मधील करोना संकटामुळे अनेक मंडळांनी आपापले गणेशोत्सव रद्द केले. काही मंडळांनी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होईल, यात शंका नाही. प्रतिवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीही पूर्ण झाली आहे. यंदा शनिवारी गणेश चतुर्थी असून, या दिवशी हस्त नक्षत्र आहे. हा योग शुभ नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुभ वेळ आणि योग्य मुहूर्त पाहूनच पार्थिव गणपती पूजन करणे मंगलकारी ठरेल, असा सल्ला दिला जात आहे.

➡️ गणेश स्थापना पूजन राहुकाल :- शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १० वाजून ३० मिनिटांपर्यंत राहुकाल आहे. हा दीड तासाचा कालावधी गणपती स्थापन करण्यासाठी अनुकूल नाही. ही वेळ सोडून गणपतीची स्थापना करावी.

➡️ गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य :-

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ.⭕

anews Banner

Leave A Comment