आशाताई बच्छाव
व-हाणे प्रकरणात चौकशी समितीचा निव्वळ दिशाभूल करणारा फार्स-राजेंद्र पाटील राऊत मालेगांव,(विजय चांदणे प्रतिनिधी)-गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार व पाणपोई जागेच्या प्रश्नावर नेमलेल्या चौकशी समितीने फक्त दिखावा म्हणून व व-हाणेतील हाँटेलावर पार्ट्या झोडण्याच्या हेतूने निव्वळ फार्स रंगविला असल्याचा आरोप आज युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी नाशिकच्या सी.ओ.यांच्याकडे लेखी तक्रारीतून सादर केला आहे. व-हाणेतील पत्रकार भवन व पाणपोई जागेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतानाच चौकशी समितीचे अध्यक्ष तथा नांदगावचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत खोटा व लबाडीचा चौकशी अहवाल तयार केला.अवघा १ पानाचा अहवाल तयार करण्यासाठी संपूर्ण महिना वाया घालवला.त्याशिवाय तीन वर्षापासून सुरु असलेल्या आंदोलनाची व संघर्षाची कुठलीही फिकीर न करता सदरच्या प्रकरणी गुन्हे दाखल करणे,व संबधितावर कारवाई करण्याचे अधिकार हे मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे असल्याचे स्पष्ट मत चौकशी अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.मग हा चौकशीचा निव्वळ फार्स व स्टंटबाजी कशासाठी?असा सवाल उपस्थित करीत युवा मराठाचे राऊत पाटील यांनी याप्रकरणी आता सगळ्यांनाच न्यायालयात घेऊन जाणार असल्याचे शेवटी सांगितले.