Home गडचिरोली एटापल्ली येथील आविका संस्थेवर आविसं (अजयभाऊ कंकडालवार) गटाचा झेंडा

एटापल्ली येथील आविका संस्थेवर आविसं (अजयभाऊ कंकडालवार) गटाचा झेंडा

94
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0061.jpg

एटापल्ली येथील आविका संस्थेवर आविसं (अजयभाऊ कंकडालवार) गटाचा झेंडा

बिजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस अभद्र युतीला जोर का झटका : रमेश टिकले यांच्या पुन्हा पराभूत           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-

एटापल्ली येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे निवडणूक आज पार पाडले.यात आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे उमेदवारांनी बाजी मारली असून बिजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभद्र उमेदवारांना पुन्हा एखादा पराभवाला सामोरे जावे लागले. सदर निवडणूक आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व जि.प.माजी उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रविंद्रबाबा आत्राम,यांच्या नेतृत्वात तर आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टमी व तालुका सचिव प्रज्वल नागूलवार यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आली.या निवडणूकीत अध्यक्ष म्हणून सत्तू रामा गावडे तर उपाध्यक्ष म्हणून मधुकर रामदास मडावी,सदस्य म्हणून रायनेद्र दिसुजी मडावी,संचालक श्री.नारायण भालू कोरेत,भालू वंझा मडावी,संचालक श्री.तिरुपती माधव मडावी,संचालक श्री.खुशाल भीमा चापले,संचालक श्री.शामराव नागो सोनुले,संचालक श्री,अनिल सोमजी करमरकर,संचालिका बंदेबाई कोमठी कांदो,रुखमाबा साईनाथ उसेंडी,जितेंद्र दशरथ टिकले आदी निवडून आले.आविसंचे नेते माजी जि.प.अध्यक्ष व बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार व बाजार समिती उपसभापती रवींद्र बाबा आत्राम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सदस्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या विरोधात श्री.रमेश टिकले,कृषी उत्पन्न बाजार समितीत उमेदवार म्हणून उभे होते मात्र त्याच्यात बाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर अभद्र युती करूनही रमेश टिकले पराभूत झाले त्यानंतर एटटापली येतील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुका घोषित झाले,व काल निवडणूका पार पडले यात अध्यक्ष म्हणून सत्तू रामा गावडे यांच्या एकाच अर्ज असल्याने सर्वानुमते ठराव परित करून बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदासाठी आविस तथा अजयभाऊ मित्र परिवार कडून श्री.मधुकर रामदास मडावी तर बाजपा राष्ट्रवादी कॉंग्रेस अभद्र युतीकडुन जितेंद्र टिकले यांनी अर्ज दाखल केले,मात्र आविस तथा अजयभाऊ मित्र परिवार चे श्री.मधुकर मडावी यांना गुप्त मतदानातून बहुमत मिळाले असून ते उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले असून कृषी उत्पन्न बाजार समिती व आदिवासी विवीध कार्यकारी संस्थेत राष्ट्रवादीचे रमेश टिकले यांच्या तरुण पराभूत झाले असून,टिकले यांच्या गटातील कार्यकाळातील अविका संस्थेतील मोठा भ्रष्टाचार झाले असून सदर भ्रष्टाचार उजेडात येवू शकतो.

यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे, नरेश गर्गम, उमेश आत्राम, विनोद रामटेके, रवी भोयर, प्रमोद गोडसेलवार, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleव-हाणे प्रकरणात चौकशी समितीचा निव्वळ दिशाभूल करणारा फार्स-राजेंद्र पाटील राऊत
Next articleउपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here