Home पालघर रस्ता साईटपट्टी सुधारीकरणाच्या नावाखाली करोडोची मलमपट्टी!!!

रस्ता साईटपट्टी सुधारीकरणाच्या नावाखाली करोडोची मलमपट्टी!!!

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20230530-WA0037.jpg

रस्ता साईटपट्टी सुधारीकरणाच्या नावाखाली करोडोची मलमपट्टी!!!

मोखाडा सा.बां. विभाग बनलेय भ्रष्टाचाराचे कुरण.

मोखाडा प्रतिनिधी

मोखाडा :“ बोगस कामे करा व लाखो रुपये कमवा.” असा उदात्त हेतू उराशी बाळगुन एक ते दीड किलोमीटर रस्त्याच्या साईड पट्टी वर थातुरमातुर काम करुन चक्क एक कोटी रुपये सांबा विभागाने खर्च केला असल्याचा प्रकार समोर आला आहे
मोखाडा सांबा विभाग हे जणू भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे हे मागील काही वर्षांच्या भ्रष्टचाराच्या प्रकरणावरून अधोरिखित झाले आहे
यामुळे बोगस कामे करून अधिकारी व ठेकेदार जनतेच्या टाळूवरील लोणी खाऊन गब्बर झाल्याचे पहायला मिळतायत असा आरोप देखील जनतेतून केला जातो आहे

मोखाडा खोडाळा राज्य महामार्गावर भेंडीचापाडा गावापासून पुढे जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची साईड पट्टी तसेच डोल्हारा ते देवबांध च्या उतारा पर्यंत तयार करण्यात आली आहे.मुळात रस्त्याची साईड पट्टी बनवताना एक ते दीड फूट खोदकाम व एक मिटर रुंद असणे अपेक्षित आहे परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ अर्धा फुट तर कुठे त्याही पेक्षा कमी खोदकाम केले असल्याचा आरोप केला जात असून तसेच त्यावर हातफोड खड्डी व मातीची मलमपट्टी करून रोड रोलर ने दाबली आहे आणि त्यानंतर काळे तेल मिक्स डांबराचा फवारा देऊन साईड पट्टी तयार करण्यात आली आहे. ठेकेदाराचा हा कामसू प्रकार म्हणजे जणू आकाशाला गवसणी घालणे होय कारण मुळात मोखाडा तालुक्यात पाऊसाचे प्रमाण अधिक आहे यामुळे धो धो बरसणाऱ्या पावसात या साईट पट्टीच्या कामाचा लवलेशही रहातो कि नाही अशी भीती नागरिकां मधून व्यक्त केली जात असून या बोगस साईटपट्टीच्या नावाखाली केला जाणारा करोडोचा खर्च म्हणजे ठेकेदार व अधिकारी यांचेच खिसे भरण्याचा उहापोह असून यामुळे यामधील झारीतले शुक्राचार्य कोण ?याचा शोध घेऊन कारवाई मागणी नागरिकांकडून केली जात आहे याबाबत अधिक माहितीसाठी उपअभियंता अहिराव यांना संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळले

Previous articleखेड तालुक्यात  वादळी वारा, गारपीट; पावसाने दाना दान,
Next articleजोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही तोपर्यंत एकही शिक्षक सोडणार नाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here